आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before The 15 August Build Babasaheb Memorial; If Not Face Agitation Athawale

15 ऑगस्टपूर्वी बाबासाहेबांचे स्मारक करा; अन्यथा राज्यभर आंदोलन करू - आठवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर 15 ऑगस्टपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम सुरू करा; अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी दिला. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

डॉ. आंबेडकरांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी इंदू मिलची जागा मिळवली, परंतु सहा महिने झाले तरी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आता विश्वास नाही. त्यांना आम्ही निवडून दिले आणि त्यांनी आम्हाला पाडले. पडायची आम्हाला सवयच आहे, परंतु आता 2014 ची जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेना, भाजप, रिपाइंची महायुती मजबूत झाली आहे. मी उपमुख्यमंत्री होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.