आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्तर तोळे सोने चोरीचा अद्यापही तपास नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या एका महिलेचे सत्तर तोळे सोने चोरीला जाऊन तब्बल दोन वर्षं झाले. पोलिस तपास करत नाहीत आणि सोने मिळता मिळेना. त्याकरता महिलेने सोलापुरातील नेते ते मुख्यमंत्री इथपर्यंत आणि सोलापूर पोलिस आयुक्त ते पोलिस महासंचालक यांना निवेदने दिली. परंतु कोणाला निवेदनाचे गांभीर्य दिसत नाही असे चित्र आहे.
रसिका राजाराम वजनम (वय ६०) दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. कुमठा नाका परिसरात घर आहे. पगारातून पैसे साठवून त्यांनी सोन्याचे दागिने तयार करून घेतले होते. त्या घराच्या बाहेर असताना डिसेंबर २०१३ रोजी घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे ७० तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

तपास काही लागला नाही. वारंवार पोलिस ठाण्याचे उंबरठे त्यांनी झिजवले. परंतु उपयोग झाला नाही. त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्याशी संपर्क साधला. यानंतर सोलापूरचे स्थानिक नेते, मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांना निवदने पाठवले. परंतु एकाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. दोन वर्षापासून तपासला गती मिळालेली नाही.
आयुष्यातील पै पै जमा करून घेतले होते सोने
- २०१३मध्ये माझ्या घरातून सत्तर तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. पोलिसांकडून तपास होत नाही याकरता मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक यांनाही निवेदन पाठवले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आयुष्याची पै पै जमा करून सोने गोळा केले होते. माझ्या मृत्यूनंतर तपास लागणार का?”''
रसिका वजनम, प्राध्यापिका
तीन तोळे मिळतात, पण ७० तोळे मिळत नाही?
याचमहिलेचे २०१४ मध्ये मोबाइल, तीन तोळे सोने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला. त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मोबाइल ट्रॅक करून चोराला पकडले. त्याच्याकडून फक्त सोने मिळाले. मात्र, पूर्वी चोरीला गेलेले ७० तोळे सोने मिळाले नाही. या प्रकरणात पोलिस तपास करत नाही का किंवा तपास दाबला जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
तपास सुरू आहे, तपास लागला की कळवू
- आमच्या पध्दतीने आम्ही सर्व प्रकारे तपाास केला. परंतु हाताला यश आले नाही. रेकॉर्डवरचे सर्व गुन्हेगार तपासून पाहिले. दुसऱ्यावेळी जेव्हा चोरी झाली तेव्हा ती उघडकीला आली आणि त्यांचा मुद्देमाल त्यांना परत देण्यात आला. याही प्रकाराचा तपास लागताच कळवू.”
अनिल बेणके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...