आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातील भंडे घोटाळा : आणखी १६ कर्मचारी आढळले दोषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेतील बहुचर्चित भंडे घोटाळ्यात आणखी १६ कर्मचारी दोषी आढळले असून त्यांच्यावर गैरप्रकाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मान्यता दिली.
घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्यास मनपा आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. पोलिसांनी तशी मागणी करताच जेटिंगराया भंडेसह श्रीराम बाजीराव लबडे, सरस्वती मनोहर जाधव, अशोक सखाराम पवार, सिद्राम अय्यप्पा म्हेत्रे, बबन श्यामराव डोंगरे, कमल सुधाकर मिरजकर, शहनाज मुर्तुज दंडू, नंदकुमार खंडप्पा शिवशरण, रमाकांत विश्वंभर तरकसबंद, लक्ष्मण सिद्राम जाधव, रमेश श्रीधर काटकर, रियाजोद्दीन गुलामहुसेन सगर, प्रकाश सादबा दळवी, अब्दुल सत्तार शाबुद्दीन शेख, जालिंदर तुकाराम शिंदे, सुभाष रतन बद्दुरकर यांच्यावर खटला भरण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. तसे पत्र सदर बझार पोलिस ठाण्याला मनपाकडून देण्यात आले.

काय आहे घोटाळा?
महापालिकाभूमी मालमत्ता विभागात गाळ्याच्या भाड्यापोटी वसूल केलेल्या रकमेत सुमारे ९२ लाखांचा अपहार झाला आहे. मुख्य आरोपी जेटिंगराया भंडेवर २००५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.