आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bheemgeet Programme Dedicated To Namdeo Dhasal At Solapur

भीमगीतांनी कवी ढसाळ यांना श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मंगळवारी संध्याकाळी दलित पॅँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांना भीमगीतांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. रिपाइं (आठवले गट) तालुका उत्तर सोलापूर आणि डॉ. आंबेडकर कलाकार समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी दत्ता गायकवाड, शिवाजी बनसोडे, अंकुश कांबळे, पंकज शिंदे, दीपक दोड्यानूर आदी उपस्थित होते. ‘मोडा परंतु वाकू नका रे, गिरवा भिमाचा धडा..’ यासारखी भीमगीते सादर झाली. गीते ऐकण्यासाठी रस्त्यावर गर्दी झाली होती. 1978 नंतर नामदेव ढसाळ यांची पांजरपोळ चौकात पहिली जाहीर सभा झाली होती. त्या सभेत अरविंद माने या युवक कार्यकर्त्याने सादर केलेले गीत ऐकून श्री. ढसाळ यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिल्याची आठवण श्री. माने यांनी सांगितली. त्यावेळी सादर केलेलं ‘घे रं र्मदा उडी जाऊ पैल थडी, पुढे मिळेल मानाचं पान, बघ आलं रं आलं रं तुफान.. या तुफानी लाटाचा जुलमी मारा, वर्णभेदाचा सुटला सोसाटी वारा, तुला नाही थारा दलितानिवारा, उठ बसलास का रं गुमान..’ हे गीतही माने यांनी सादर केलं.