आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमराव पाटील वडकबाळकर यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर, सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भीमराव पंडित पाटील- वडकबाळकर (वय 73) यांचे गुरुवारी सकाळी दहा वाजण्याचा सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री 10.15 च्या सुमाराला वडकबाळ येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या मागे दोन पत्नी, विवाहित मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या 50 वर्षांपासून ते बांधकाम व्यवसायात होते. शहर, जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. राजकीय क्षेत्रातही त्यांचा मागील अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 2000 ते 2005 या कालावधीत ते सभापती होते. (कै.) बाबूराव चाकोते उर्वरित पान 12

यांच्याकडून काटावरच्या बहुमतात बाजी मारून त्यांनी सभापतिपद स्वत:कडे खेचून आणले होते. बाजार समितीच्या कामात पारदर्शी आणताना त्यांनी समितीच्या हिताची चांगली कामे केली होती. याशिवाय सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, सिद्धेश्वर सहकारी बँक, वळसंग सूत गिरणी, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे ते संचालक होते. पाटील अँन्ड कंपनीचे प्रमुख म्हणून देशात त्यांनी अनेक मोठमोठी कामे केली.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सोलापुरातील सातरस्ता परिसरातील पंडित निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी व बांधकाम व्यावसायिकांनी हजेरी लावली. जगद्गुरू र्शी. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, र्शी योगिराजेंद्र शिवाचार्य स्वामी, आमदार सिद्रामप्पा पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार दिलीप माने, आमदार प्रणिती शिंदे, धर्मराज काडादी, माजी मंत्री आनंदराव देवकते, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, महापौर अलका राठोड, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी आमदार शिवशरण पाटील, गोपाळ कोरे, डॉ. चनगोंडा हाविनाळे, जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड, नागेश बिराजदार आदी उपस्थित होते.