आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भुईकोट किल्ल्यास निधी देणार’ केंद्रीय पर्यटनमंत्री नाईक यांची भंडारकवठे येथे ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - सोलापूरचा भुईकोट किल्ला आणि हत्तरसंग कुडल येथील प्राचीन संगमेश्वर देवस्थानच्या विकासासाठी प्रस्ताव आल्यास त्यासाठी नक्कीच निधी देऊ, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवडे येथे कमल संदेश यात्रेच्या उद्घाटनासाठी श्री. नाईक यांच्याहस्ते शनिवारी झाले.

या निमित्ताने माजी खासदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेसाठी सोलापूर दक्षिणसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. या मतदारसंघात भाजपला चांगले वातावरण असल्याने ही जागा भाजपला मिळावी, अशी शिफारस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाला करणार असल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी घोषित केले.