आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे दरमहा जमतो पुस्तकप्रेमींचा मेळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बदर महिन्याच्या पहिल्या रविवारी शहरातील काही पुस्तक प्रेमी एकत्र जमतात. आपल्या वाचनात आलेल्या पुस्तकांचे कथन केले जाते. गेल्या दीड वर्षापासून अखंडपणे हा उपक्रम सुरू आहे. डॉ. संध्या आणि डॉ. विजय रघोजी यांच्या ‘निहारिका’ बंगल्यावर पुस्तकप्रेमींचा हा मेळा जमतो.
धावपळीच्या या जगात स्वत:बरोबर इतरांचेही अनुभवविश्व समृद्ध करणारा, बहुर्शुत बनवणारा हा उपक्रम सुचला तो ज्येष्ठ कलावंत व दिग्दर्शक शशिकांत लावणीस यांना. डॉ. रघोजी यांनी आपल्या घरातच हा उपक्रम सुरू करण्यास सुचवले. नाट्य सेवेच्या निमित्ताने लावणीस यांनी देशात आणि परदेशातही पुष्कळ प्रवास केला. अनेक दिग्गज लेखकांच्या कथा, कादंबरीचे अभिवाचन केले. खूप वाचन केलेलेही इतरांशी त्या पुस्तकांबद्दल बोलू शकतातच असे नाही, हे लावणीस यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी एकाच वेळी अनेकांनी आपण वाचलेल्या पुस्तकांचे कथन करावे असा संकल्प केला. मराठी, हिंदीपेक्षा इंग्रजी पुस्तके वाचनात कमी येत असल्याने त्या पुस्तकांना या अधिक प्राधान्य दिले जाते. आजवर अनेक मान्यवरांनी विविध लेखकांच्या पुस्तकांचे कथन केले आहे.
यांनी नोंदवला सहभाग
दीपक गाडगीळ (मॅन हंट) र्शीकांत कुलकर्णी (सेवन हॅबीट्स), विश्वास काकडे (8 हॅबीट्स), डॉ. बाहुबली दोशी (फॉर हिअर ऑर टु गो), प्रकाश बुरूटे (1984) यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. रमाकांत आयाचित यांनी व. पु. काळे, विद्या लिमये यांनी प्रभाकर पणीशकरांच्या तो तीच या पुस्तकाचे, तर हेमंत कुलकर्णी यांनी संस्कृती पुस्तकाचे कथन के ले. डॉ. ए. व्ही. कुलकर्णी यांनी शुर्पणकाव कथान केले तर सुलभा पिशवीकर, पुष्पा आगरकर, वनिता म्हैसकर, कुशल कुलकर्णी, पराग फडके, सुधाकर देशमुख, डॉ. गौरी कहाते, डॉ. अशोक आपटे, डॉ. माधवी वाळवेकर, वीणा पवार ही मंडळी या समूहात असतात.

आपल्या रोजच्या वाचनात अनेक पुस्तके येतात. मात्र त्याबद्दल सगळ्यांशी बोलणे होते असे नाही. या निमित्ताने मी अनेकांच्या वाचनात भर घालू शकतो. याचा आनंद आहे. यातून अनेक अनुभव एकमेकांना कळतील असे वाटते. शशिकांत लावणीस, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक