आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजापूर रस्त्याची सफाई सुरू; 100 मिळकतींवर बुलडोझर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विजापूर रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम शनिवारी सुरू झाली. तीत 100 इमारती, खोकी हटवण्यात आली. महापालिकेने अतिक्रमण, परवान्याशिवाय बांधकाम आदी प्रकरणी येथील 193 जणांना नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी 100 मिळवतींवर शनिवारी कारवाई झाली. राहिलेली कारवाई सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे.

होटगी रस्त्यावर थेट झालेली मोहीम विजापूर रस्त्यावर मात्र, टप्प्याटप्प्याने होत आहे. त्यामुळे अचडणी येत आहेत. विनोबा भावे गृहनिर्माण सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण केलेले खोके काढताना विरोध झाला. तो न जुमानता जेसीबी चालवण्यात आला. मोहीम तीन तास चालली.

जुन्या विजापूर नाक्यापासून कारवाईस सुरुवात झाली. रस्त्याच्या मध्यभागापासून 21 मीटरवरील अतिक्रमण, अवैध बांधकाम पाडण्यात आले. महापालिकेच्या इमारतीत नगरसेवक मधुकर आठवले यांच्या संपर्क कार्यालयासमोरील काही भाग तसाच ठेवण्यात आला. त्याच्या शेजारील अतिक्रमण काढले. परिसरातील अन्य दुकाने काढली. आयटीआय पोलिस चौकीजवळील हॉटेल रसुलसह इतर पाच ते सहा दुकानदारांनी न्यायालयाकडून आदेश आणला. त्यामुळे ते पाडले नसल्याचे अधिकारी बी. बी. भोसले यांनी सांगितले.

सैफुल परिसरात जिगजणी पंपाच्या शेजारील मैदानावरील खोक्यांवरही जेसीबी चालला. एम. डी. शेख यांच्यासह काहींनी त्यास हरकत घेतली. बांधकाम 1990 चे असल्याची कागदपत्रे दाखवली. मात्र, अधिकार्‍यांनी ते अमान्य करून कारवाई पूर्ण केली. कित्तुर चन्नम्मानगरच्या बाजूचे गाळे आणि अतिक्रमण काढण्यात आले. अक्षय हॉटेलसमोरही कारवाई झाली. पण हॉटेलचा काही भाग तसाच ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला.