आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात मोठे वॉल पेंटिंग, सोलापूरच्या नीलेशने भरले रंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे १२० फूट उंच आणि १५० फूट रुंद वॉल पेंटिंग बांद्रा (मुंबई) येथील एमटीएनएलच्या इमारतीवर साकारण्यात आले आहे. देशातील हे सर्वात मोठे स्ट्रीट वॉल पेंटिंग मानण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या पेंटिंगमध्ये सोलापूरचे चित्रकार नीलेश खराडे यांनी रंग भरले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि जाहिरात क्षेत्रातील पीयूष पांडे यांच्या हस्ते गुरुवारी त्याचे उद््घाटन करण्यात आले. रणजित दाहीया (नवी दिल्ली), मुनीर बुखारी (राजकोट), यतीन यांत्रा (गोहत्ती)आणि सोलापूरच्या नीलेश खराडे या युवा चित्रकारांनी हे साकारले आहे.
असे साकारले पेंटिंग
एमटीएनएलच्या ११ मजली इमारतीवर १८ हजार चौरस फूट आकारात भव्य वॉल पेंटिंग साकारले आहे. या चित्रासाठी दहा दिवस लागले. सुमारे ८०० लिटर पेंट लागला आहे. एशियन पेंट कंपनीने हा पेंट दिला. देशात दिल्ली, कोलकाता, बंगळुरू अशा मोठ्या शहरात अशी मोठी वॉल पेंटिंग उभारण्यात आलेली आहेत. केरळ येथील कोची येथे १६ हजार चौरस फुटातील वॉट पेंटिंग आहे.
खराडे मूळचा सोलापूरचा
वॉट पेंटिंगच्या माध्यमातून देशपातळीवर नाव करणारा चित्रकार खराडे हा मूळचा सोलापूरचा. पूर्व भागात दाजी पेठेत यल्ला-दासी यांची चित्रकारी पाहत तो मोठा झाला. सिद्धेश्वर प्रशालेत प्राथमिक शिक्षण झाले. पुढे पुण्यात चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. वॉल पेंटिंग, ग्लास पेंटिंग, कॅनव्हास चित्रकलेत नीलेशचा हातखंडा आहे. मुंबई, कोलकाता, गोवा येथे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भव्‍य पेंटिंग्‍ज