आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihari Thieves Power In Nashik, Haridwar, Gorkhapur

नाशिक, हरिद्वार, गोरखपूरमध्ये बिहारी चोरांचा आहे दबदबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ज्योती टेलिकॉम मोबाइल दुकान फोडताना दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात पडलेत. या टोळीचा दबदबा नाशिक, हैदराबाद, हरिद्वार, लखनऊ, गोरखपूर, उत्तर प्रदेश या भागात आहे. या ठिकाणीही अनेक चो-या केल्याची कबुली प्राथमिक तपासात दिली असून याची खातरजमा करण्यात येत आहे. चोरलेले मोबाइल नेपाळमध्ये नेऊन विक्री करीत असल्याची माहिती समोर येतेय. सोमवारी या टोळीकडून आणखी मोठी माहिती उजेडात येईल.

वुडलँडदुकानातही झाला होता चोरीचा प्रयत्न : दीडवर्षापूर्वी चव्हाण मोबाइल दुकान फोडले. त्याच दिवशी व्हीआयपी रोडवरील सिटी हॉस्पिटल शेजारील वुडलँड शोरूमध्येही किरकोळ चोरी झाली होती. याशिवाय याच भागात एका ज्वेलरी दुकानाच्या वॉचमनला आम्ही आताच स्टेशनवरून आलोत. प्यायला पाणी आहे का असे विचारले होते. एकाच दिवशी दोन दुकानात चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास लागलाच नव्हता. चव्हाण मोबाइल दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी आज पुन्हा झाली. शनिवारी ज्योती टेलिकॉम दुकानात मोबाइल घेण्यासाठी चोरटे गेले होते. त्यातही चोरांची छबी कैद झाली आहे का, याची पाहणी करण्यासाठी फुटेज घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोर टेबिहारचे... तपास मात्र स्थानिक पातळीवर : सोलापुरातअसा एकही दिवस गेला नाही की चोरी नाही. परजिल्हा, परराज्यातून चोरटे सहज सोलापुरात येतात आणि रातोरात चोरी करून निघून जातात. आपले पोलिस मात्र अचानक दिवसा नाकाबंदी करा, पेट्रोलिंग करा असे नियोजन करतात. बसस्थानक रेल्वेस्थानक आणि राष्ट्रीय महामार्गावर दररोज पहाटे तीन ते सहा यावेळेत सक्षमपणे नाकाबंदी, स्टेशन, बसस्थानक परिसरातील संशयितांची चौकशी केल्यास अनेक चोरटे हाती लागू शकतात. बंदोबस्त वाढविला असे ठरलेले उत्तर देण्याऐवजी आजच्या घटनेवरून तरी पोलिस नियोजन करणे अपेक्षित आहे.

यांनी केली कामगिरी
पोलिसकॉन्स्टेबल म. इसाक नदाफ, अप्पासाहेब घोळवे, लक्ष्मण खरात यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे चोरट्यांची टोळी हाती लागली. पेट्रोलिंग ड्यूटीवर असलेल्या घेाळवे यांनी घटनास्थळी चाेरट्यांना पाहिले. संशय बळावल्याने त्यांनी मेसेज देताच नदाफ खरात मदतीला धावले. त्यांना भय्या चौकात चोरट्यांना ताब्यात घेतले.

सर्व बाजूने यांची तयारी असते
सर्व पोलिस ठाण्यांना याची माहिती देण्यात येणार आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौकातील चव्हाण मोबाइल चार पुतळा भागातील दुकान याच चोरांनी फोडल्याची कबुली दिली. चोरटे सर्व बाजूने तयारीनिशी येतात. काम फत्ते झाले की शहरातून बाहेर पडण्याचा त्यांचा पहिला प्लॅन असतो. चौकशीत अजून माहिती मिळेल.रेल्वे स्टेशन, बस स्टॅड परिसरात असे संशियत सापडतात.” मोहनशिंदे, पोलिस निरीक्षक