आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक अनियमितता नको यासाठी काढले परिपत्रक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तीन आणि २५ हजारांच्या आतील बिल तुकडे पाडून अदा करू नये किंवा तसे काम करू नये, असे आदेश महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी काढले. त्यासाठी त्यांनी मनपाच्या १८ विभागांना परिपत्रक जारी केले.
२०११-१२ च्या मनपा लेखापरीक्षण अहवालात तीन आणि २५ हजारांचे बिल तुकडे पाडून अदा केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आर्थिक अनियमितता हाेण्याची शक्यता असल्याने दक्षता घेण्यासाठी आयुक्त काळम-पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
यात झाली अनियमितता
सामान्य प्रशासन विभागाच्या भांडार शाखेकडून ६२.७८ लाखांचे संगणक साहित्य तीन हजारांचे तुकडे पाडून खरेदी.
आरोग्य विभागाकडून २०.९८ लाख साहित्य निविदा मागता खरेदी.
आरोग्य विभागाने २१.१३ लाखांचे कीटक जंतूनाशके तीन हजार रुपयांचे तुकडे पाडून खरेदी केली.
तुकडे पाडलेल्या बिलास सहमती

तीन२५ हजारांच्या बिलात तुकडे पाडू नये असे आदेश यापूर्वीपासून आहेत. तरीही त्याचे पालन करता बिल अदा केले. ही बाब आयुक्तांच्या नजरेस आली. ती वित्तीय नियमाच्या विसंगत आहे. त्यामुळे यापुढे अपेक्षित खर्चाला सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी. तुकडे पाडलेल्या कामाला लेखापरीक्षण शाखेने मंजुरी देऊ नयेत. शासनाने खरेदी बाबत कार्यपद्धती ठरवून दिली आहे. त्यानुसारच काम करावे आदी सूचना आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केल्या आहेत.