आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोकांच्या जीवाला घोर, बैठका, कागदोपत्रीच खल; माळराने नव्हे भविष्यातील जीन पूल बँका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बीएनएचएस संस्थेतील अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांनी नुकत्याच केलेल्या पक्षी त्यांचा अधिवास याबाबत केलेल्या संशोधनात देशातील दहा महाराष्ट्रातील दोन पक्षीक्षेत्र धोकाग्रस्त असल्याचे आढळले आहे.
त्यामध्ये सोलापूर नगर जिल्ह्यात आढळणाऱ्या माळढोक पक्षी अभयारण्याचा समावेश आहे. तसेच, इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (आईयूसीएन) यांनी सन २०११ मध्येच माळढोक पक्ष्यांचा समावेश जगातील अतिसंकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत केलेला आहे.
देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांच्या यादीतील माळढोकच्या संरक्षण संवर्धनासाठी तत्काळ प्रोजेक्ट बस्टर्ड सुरू करण्याची गरज आहे. कृत्रिम प्रजनन संकल्पनेच्या व्यवहार्यतेबद्दल चर्चा करण्यातच वेळ घालण्यापेक्षा त्यांच्या संरक्षणाची हीच योग्य वेळ असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत माळढोक पक्षी रानम्हशींच्या संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन करणे हा शेवटचा पर्याय असल्याचे जाहीर केले होते. देशातील वन्यजीव अभ्यासकांकडून वारंवार ओरडून सांगण्यात येणाऱ्या गोष्टी स्वीकारण्यासाठी राज्यशासनाला तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागला होता. त्यासाठी दहा कोटींची प्राथमिक तरतूद करण्यात आली. पण, प्रत्यक्षात ठोस कृती धोरण झाले नाही. त्याचाच फटका अस्तित्वासाठी झगडणाऱ्या माळढोक पक्ष्यांना बसला आहे.

ज्येष्ठ पक्षीमित्र बी. एस. कुलकर्णी, बॉम्बे नॅचर हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. असद रेहमानी यांनी सहा वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडे माळढोकांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट बस्टर्ड राबवण्याची संकल्पना मांडली होती.

^माळढोकसाठी तातडीने उपाययोजनांची गरज आहे. गिधाडांच्या संरक्षणासाठी राबविलेल्या प्रकल्पाचा चांगला फायदा झाला. त्यांची संख्या हळूहळू वाढली. माळढोकांबाबत जनतेच्या मनात संताप वाढतोय. पक्ष्यांचे संरक्षण संवर्धन करण्याबरोबर नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. सुजितनरवडे, माळढोकअभ्यासक, बीएनएचएस, मुंबई
^माळढोकचे सोलापूर नगर जिल्ह्यातील क्षेत्र, चंद्रपूर नागपूर जिल्ह्यातील माळढोकांचा अधिवास क्षेत्र, अकोला जिल्ह्यातील तणमोरांचा अधिवास असणारी ठिकाणे नाशिक जिल्ह्यात पूर्वी माळढोक आढळणाऱ्या ठिकाणी माळरान गवत राखण्यात आले. पुढील कामांसाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. डॉ.विनय सिंग, अतिरिक्तप्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर

^प्रोजेक्ट टायगरप्रमाणेच माळढोकांच्या संरक्षण संवर्धनासाठी प्रोजेक्ट बस्टर्ड करायला हवा. तज्ज्ञ अभ्यासकांच्या मदतीने, मानवी वसाहत, औद्योगिक क्षेत्रापासून फार दूर ठिकाणी हा प्रकल्प राबविल्यास त्याचा फायदा होऊ शकेल. डॉ.असद रेहमानी, तज्ज्ञसंचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई
यामुळे धोका
गेल्याचार वर्षातील माळढोकांची आकडेवारीत दरवर्षी दोन, चारने पक्ष्यांची संख्या घटत आहे. करमाळा (जिल्हा सोलापूर) रेहकुरी (जिल्हा नगर) येथे गेल्या सात ते आठ वर्षांपासून एकही माळढोक आढळला नाही. त्याकडे वेळीच लक्ष देण्याऐवजी अभयारण्य परीक्षेत्रातील जमीन खरेदी विक्रीवर निर्बंध, रस्ते, कालव्यांच्या कामांना विरोध करण्याच्या भानगडीत अधिकारी अडकले. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रशासनाच्या ऐवजी माळढोकमुळे विकास रखडला, अशीच भावना निर्माण झाली.
प्रोजेक्टचा फायदा
माळढोकमुळे गवताळ माळरान समृद्ध होते. माळराने ही तृणधान्याच्या भविष्यातील ‘जीन पूल बॅका’ आहेत. त्यामुळे प्रोजेक्ट बस्टर्ड आवश्यकच. दुर्मिळ पक्षांपैकी एक असणारा तणमोर बंगाली तणमोर, लांडगा, गवताच्या प्रजातींची पिके, दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण होणार आहे.
गुजरातमध्ये रिडओ टॅगिंग
कच्छच्या नलिया गवताळ माळरानावर एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद केले आहेत. तो काळ माळढोकांसाठी प्रजननचा असतो.

अबुधाबीमध्ये प्रजनन
इंटरनॅशनल फंड फॉर हुबारा (बस्टर्ड) कंझर्वेशनने अात्तापर्यंत हजारो हुबारा बस्टर्डचे प्रजनन केले आहे. चीनमध्ये बस्टर्डसाठी प्रजनन सेंटर बनविण्यात येत आहे. मोरक्कोमध्ये आत्तापर्यंत कमीतकमी ५० हजार हुबारा बस्टर्ड प्रजनन केले आहे. त्यापैकी ६५ टक्के पक्षी वाचले आहेत.

रेडिआे कॉलरिंग
देहरादून येथील वाइल्डलाइफ इिन्स्टट्यूटने माळढोकांवर उपग्रहांद्वारे लक्ष ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित केली.गेल्यावर्षी विदर्भातील वरेरा येथे एका माळढोकास पीपीटी यंत्र बसविले. पण, दोन्ही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

महाराष्ट्रात कृत्रिम प्रजनानाची योजना अद्याप फाइलींमध्ये अडकली आहे. कृत्रिम प्रजननाद्वारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड देशात नामशेष होणाऱ्या बस्टर्डच्या प्रजातींचे कृत्रिम प्रजनन केल्यामुळे तेथे पक्ष्यांची संख्या उच्चांकी स्तरापर्यंत पोचली आहे.