आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात कार्यतत्परतेचा राजर्षी शाहू महाराजांचा आदर्शपाठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - समाजाचा पोत सुधारण्यासाठी कुशल नेतृत्वाची गरज असते. लोककल्याणकारी राज्याचा कारभार करणारा लोकनेता म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा नावलौकिक आहे. लोकोत्तर राजांचे शिक्षण, मागासकल्याण, पुरोगामी दृष्टिकोन हे पैलू नेहमीच चर्चेत आले. त्याकाळी दुष्काळ निवारणासाठी राबवलेले धोरण सद्यस्थितीतही उपयुक्त असे आहे. शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करीत असताना त्यांच्या दृष्टिकोनाचा वस्तुपाठ समजून घेणे गरजेचे आहे.

छावण्या आणि टँकरचे अर्थकारण हा विषय दुष्काळी काळात नेहमीच चर्चेत असतो. 1896-97 मध्ये कोल्हापुरात मोठा दुष्काळ पडला होता. संस्थानात स्वतंत्र दुष्काळ विभाग स्थापन करून मदत केंद्रे खुली करणारा त्याकाळात एकमेव राजा म्हणून त्यांची ख्याती होती. दुष्काळग्रस्तांसाठी स्वस्तात धान्य वाटप योजना राबवून वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्याचा त्याकाळी त्यांनी प्रयत्न केला. व्यापार्‍यांना होणारा तोटा संस्थानातून देण्याचे फर्मान सोडले. 1896-97 व 1899 1900 या काळात खुद्द म्हैसूरच्या महाराजांकडून व ब्रिटिश सरकारकडूनही धान्य मागवून घेतले. दुष्काळात पिण्याच्या पाण्याचा प्रo्न गंभीर होता. विहीर खोदाई, तलाव, बंधारे, धरण बांधले. त्यातील एका तलावाला त्यांनी लक्ष्मीबाई असे नाव दिले. जुन्या विहिरींमधील गाळ काढला. जमीन ओलिताखाली आणण्यासाठी राधानगरी धरण बांधले. रयतेची उपासमार होऊ नये रस्ते बांधणी, पूल बांधणे अशा रोजगाराच्या योजना महाराजांनी राबवल्या.

1 नोव्हेंबर 1896 पासून दुष्काळी भत्ता सुरू केला. त्यांच्याच काळात निपाणी दाजीपूर हा महत्त्वपूर्ण रस्ता जोडणी प्रकल्प राबवला गेला. दूरदृष्टीशिवाय हे शाश्वत विकासाचे काम उभे राहू शकत नाही. त्यांच्या कार्याचा आदर्शपाठ कायम अमलात आणणे, ही त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे.