आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 तासांच्‍या शर्थीच्या प्रयत्नांमुळे विहिरीत पडलेल्‍या गव्याची सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाबळेश्वर - महाबळेश्वरपासून 10 कि.मी अंतरावर मुकवली परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे मळे आहेत. यावर ताव मारण्यासाठी आलेला एक गवा बुधवारी 50 फूट खोल विहिरीत पडला. गुरुवारी स्थानिक शेतकरी विहिरीजवळ आल्यानंतर त्यांना गवा पाण्यात पडल्याचे दिसले. संबंधित शेतक-याने ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाला याबाबत माहिती दिली. सुरुवातीला जाळीच्या साहाय्याने गव्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यश आले नाही. शर्थीच्या प्रयत्नानंतर गवा जाळीत बसला व क्रेनच्या साह्याने वर काढण्यात आले. वन विभाग व ग्रामस्थांच्या 36 तासांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.