आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप घेणार कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून बूथ कमिटी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष टीम तयार करण्यात येईल. त्यातील कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग घेतले जातील, सोशल नेटवर्किंग उभारले जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजप पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीची बैठक व मेळाव्यासाठी सोमवारी सोलापुरात आलेले श्री. फडणवीस हे र्शमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात बोलत होते. आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यात 82 हजार बूथ समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या गणांतही या समित्या असतील. ही प्रक्रिया 25 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होईल. त्यानंतर या बूथ कार्यकर्त्यांचा महामेळावा होईल.

सोशल नेटवर्किंग यंत्रणेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. ही सर्व यंत्रणा लोकसभा निवडणुकीत काम करील. त्यासाठी विभागीय मेळाव्यांतूनही माहिती दिली जात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. प्रारंभी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. सरचिटणीस राकेश कदम यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. आमदार विजय देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.