आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा आज "शहर उत्तर'मध्ये मेळावा , केंद्रीय मंत्री सिद्धरामेश्वरय्या येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधानसभानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी (दि. २०) घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सिद्धरामेश्वरय्या हे येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. जागा वाटपाबाबत महायुतीचा घोळ कायम असला तरी भाजपने मात्र विधानसभेची तयारी सुरू केली आहे.
शहर उत्तरचा मेळावा सायंकाळी चार वाजता दत्त चौकातील आनंद मंगल कार्यालयात होणार आहे. तर अक्कलकोट येथील मेळावा सकाळी ११ वाजता मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात होणार आहे. तसेच शविस्मारक सभागृहात प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.