आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये सोलापूरच्या उमेदवारीवरून निवेदन युद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार ठरवण्याबाबत भारतीय जनता पक्षाची दयनीय स्थिती दिसत आहे. काँग्रेसने कृतज्ञता मेळावा तर आम आदमी पक्षाचे ‘झाडू चलाओ’ मोहीम राबवत प्रचार सुरू केला आहे. तर भाजपात उमेदवारीचा तिढा सुटला नाही.
माढय़ात भाजपच्या कार्यकर्त्यांना कमळाऐवजी दुसर्‍या चिन्हावर मतदान करावे लागणार आहे. सोलापुरातून अँड. शरद बनसोडे यांची पक्षास गरज आहे, असा अंदाज कार्यकर्ते काढत आहेत. स्थानिकांना उमेदवारी द्या, अशी मागणी करत संजय क्षीरसागरसह एक गट पुढे झाला आहे. अँड. बनसोडे यांनाच निवडणूक रिंगणात उतरवा असे मंडल अध्यक्षांचे मत आहे.
अँड. बनसोडे यांना द्या
एकीकडे स्थानिकांना उमेदवारी द्या, अशी मागणी होत असताना दुसरीकडे अँड. बनसोडे यांना उमेदवारी द्या अशी मागणी पाच मंडल अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी केली. सोलापूर लोकसभेचे प्रभारी आमदार विजय देशमुख यांना तसे निवेदन दिले. या वेळी ऋषिकेश अकतनाळ, सतीश महाले, व्यंकटेश कोडी, जयवंत थोरात आदी उपस्थित होते.
आज मुंबईत बैठक
भाजप राज्य कोअर कमिटीची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. त्यात सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल, त्या नावाची शिफारस केंद्राच्या कोअर कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्‍या यादीत सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराची घोषणा होईल.