आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकपद रद्द करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती,जगदीश पाटील यांना दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भाजपचेनगरसेवक जगदीश पाटील यांचे नगरसेवकपद रद्द करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी स्थिगिती दिली. जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने पाटील यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे ठरवले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रद्द केले होते. त्यावर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी न्यायमूर्ती अनुप मेहता आणि एम. एम. जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली आणि त्यांच्या नगरसेवकपद रद्दला स्थगिती मिळाली.
अनिल गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन पाटील यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने जप्त केले होते. त्यामुळे त्याचे नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यावर पाटील यांनी अॅड. शैलेंद्र कानेटकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी दोनवेळा युक्तीवाद झाला. त्यानंतर पाटील यांच्या नगरसेवकपद रद्दला न्यायालयाने 17 डिसेंबर पर्यंत स्थगिती दिली. याप्रकरणी निवडणूक आयोग, जात पडताळणी समिती आणि महापालिका आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पाटील यांच्या नगरसेवकपद रद्दला स्थगिती मिळाली असली पालिकेस बुधवारी सायंकाळपर्यंत याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नाही.