आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या पदाधिकार्‍यांविना होणार भाजपचा मेळावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अंतर्गत लाथाळ्यांमुळे शहर भाजपमध्ये शह, काटशहाचे राजकारण सुरू आहे. शहराध्यक्षांची निवड होऊन तीन महिने उलटले तरी इतर पदाधिकार्‍यांची निवड जाहीर झालेली नाही. त्यामुळे पक्षाच्या बैठकीला मोजकेच लोक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. असे असतानाही प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक व पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा 8 जुलै रोजी सोलापुरात होत आहे.

भाजप शहराध्यक्षपदाची निवड मार्च महिन्यात झाली. त्यानंतर सुरू झालेली अंतर्गत सुदोपसुंदी सुरूच आहे. मनपा पक्षनेता निवडीवरून आठ नगरसेवक नाराज आहेत. कुरघोडी वाढल्याने शहराध्यक्ष देशमुख यांनी नूतन पदाधिकार्‍यांची निवड केली नाही. पण ‘चलती का नाम गाडी’ असे किती दिवस चालणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकार्‍यांचा मेळावा 8 जुलै रोजी सोलापुरात होणार आहे. पूर्वतयारी करण्यासाठी भाजप कार्यालयात शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीस नाराज गटातील आठ नगरसेवकांसह शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी दांडी मारली. नगरसेवक सुरेश पाटील, शिवानंद पाटील, शशिकला बत्तुल हे स्थायी समिती सदस्य आहेत. शनिवारी स्थायी समितीची सभा होती, त्यामुळे ते गेले नाहीत. त्या बैठकीस मोजकेच कार्यकर्ते असल्याने ती आटोपती घ्यावी लागली.

प्रक्रिया सुरू आहे
शहर भाजपच्या नवीन पदाधिकारी निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. लवकरच बैठक होऊन नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात येणार आहेत. नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत विद्यमान पदाधिकारी काम पाहतील. प्रा. अशोक निंबर्गी, शहर सरचिटणीस, भाजप

यासाठी आहे वाद
शिक्षण मंडळ विरोधी पक्षनेता निवड
शहर पदाधिकारी निवड
मनपा विरोधी पक्षनेता निवड
शिक्षण मंडळ निवडणूक