आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Subhash Deshmukh, Latest News In Divya Marathi

सुभाष देशमुख म्हणतात, काळ हेच त्यावर उत्तर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदार संघातून लक्षवेधी लढत देणारे माजी खासदार, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख सध्या शांत आहेत. माढा मतदार संघाच्या निवडणुकीची जबाबदारी देत पक्षाने त्यांना उमेदवारीच्या स्पर्धेतून बाद केले. उस्मानाबाद मतदार संघातून मुलगा रोहन यांच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत. देशमुखांची ही स्थिती का झाली? नेमके काय आहे त्यांच्या मनात? हे जाणून घेण्यासाठी साधलेला संवाद.
प्रश्न : रोहन देशमुख उस्मानाबाद मतदार संघातून अपक्ष म्हणून लढल्यास ते महायुतीच्या उमेदवाराला मारक ठरेल, असे काही लोकांचे खासगीमध्ये म्हणणे आहे.
उत्तर : काळ हेच त्यावरचे उत्तर आहे.
प्रश्न : लोकसभेसाठी पक्षाने तुमचा विचार केला नाही. असे का झाले? पक्षाकडून तुमच्याकडे दुर्लक्ष झाले आहे का?
उत्तर : 1998 पासून राजकारणात आहे. कधीही उमेदवारीची मागणी केली नाही आणि करणारही नाही. आमच्या वरिष्ठांनी सर्वेक्षण केले असेल. त्यांना इतर उमेदवार चांगले वाटले असतील. दुर्लक्ष कसे? आता माढा लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक प्रमुख आहे. पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. महायुतीमध्ये भाजपला 28 जागा आल्या. माढय़ाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. तेच आता उमेदवार आहेत.
प्रश्न : तुम्ही मागणी केली नाही म्हणता, पण तुम्ही उस्मानाबादची जागा मागितली होती, त्यासाठी पाठपुरावा केला होता?
उत्तर : कोण म्हणतंय?
प्रश्न : तुळजापूरच्या सभेत तुम्ही जाहीरपणे तसे बोललात!
उत्तर : तुळजापूरच्या सभेत भारतीय जनता पक्षाकडे रोहन देशमुख यांच्या उमेदवारीसाठी मागणी केल्याचे म्हटले होते. भाजप नसेल तर शिवसेनेकडे पाठपुरावा सुरू असल्याचे म्हटले होते. त्या सभेत मी ‘क्या खाना तो दम खाना’, असेही सांगितले होते. बघू या काय होते ते.
प्रश्न : अनुसूचित जातींसाठी राखीव मतदार संघ असलेल्या सोलापुरात भाजप उमेदवाराचा प्रश्न आहे. तुमचा उमेदवार ठरलाय का?
उत्तर : सोलापुरातही चांगला उमेदवार मिळेल. शरद बनसोडे, सुरेश कोरे, प्रसंगी उत्तमप्रकाश खंदारे यांच्यासारखाही उमेदवार असू शकेल.
प्रश्न : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही पंढरपुरातून उभे राहणार अशी चर्चा झाली. लगेच दुसर्‍या दिवशी तुम्ही तुळजापूरला गेलात? हा निर्णय कसा काय बदलला?