आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ तिकिटांचा काळाबाजार; सलगरेचा रेल्वे कर्मचारी अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सलगरे रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्रात तत्काळ तिकिटांचा काळाबाजार करताना एका रेल्वे कर्मचार्‍यास रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने शनिवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी चिन्नू नरेश प्रसाद (वय 27, सध्या रेल्वे कॉर्टर्स सलगरे) यास अटक करून रेल्वे न्यायालयात हजर केले असता 15 हजार रुपयांच्या जातमचुकल्यावर चिन्नू प्रसाद यांस जामीन देण्यात आला.
चिन्नू प्रसाद हे सलगरे रेल्वे स्थानकावर पॉइन्टसमन पदी सेवेत आहेत. त्यांनी बांद्रा-जम्मू तावीचे (गाडी क्रमांक 12471 ) थ्री टायर एसीचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी दलालास मदत केली. तिकीट 8,160 रुपयांचे होते. रेल्वे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी प्रसाद यास ताब्यात घेताच दलालाने तेथून पळ काढला. दलालाची गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. संबंधित दलालाचा तपास सुरू आहे. ही कारवाई विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक पी.एम. उबाळे व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे.