आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्त महागले, आता एका पिशवीस मोजावे लागणार 1200 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या प्रस्तावानुसर राज्य शासनाने रक्त व रक्त घटकांच्या पुरवठ्यासाठी आकारण्यात येणार्‍या शुल्कात दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. त्यामुळे सोलापुरात 5 जूनपासून एका रक्ताच्या पिशवीसाठी (350 एमएल) 350 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. शासकीय रक्तपेढ्यांमध्ये घेण्यात येणार्‍या शुल्कांच्या बरोबरीने खासगी रक्तपेढ्यांनीही वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनले आहे.

राष्ट्रीीय रक्त धोरणाची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्याकरिता राज्यातील धर्मादाय संस्था संचलित व खासगी रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्त घटकांच्या पुरवठ्यासाठीचे सेवाशुल्क निश्चित करण्यात आले होते. परंतु रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या चाचणीसाठी लागणारे केमिकल व तंत्रज्ञांच्या पगारातही वाढ करावी लागल्यामुळे रक्तपेढ्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला. रक्त पिशवीच्या दरात अचानक 350 रुपयांची वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा महागडी बनणार आहे.
सिव्हिल रक्तपेढीमध्ये अद्याप 450 रुपयेच दर
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्वीप्रमाणेच प्रति रक्त पिशवीचा दर 450 रुपये आहे. शासकीय दरवाढीचे आदेश अद्याप आम्हाला मिळालेले नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच दर आकारले जात आहेत. खासगी रक्तपेढ्यांनी दरवाढ केली आहे. सिव्हिल रक्तपेढीमध्ये दरवाढीच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही.
ए. एल. इंदापुरे, सिव्हिल रक्तपेढी
सर्वसामान्यांच्या हितासाठी सोलापुरात 1200 रुपयांना पिशवी
४शास्त्रीयदृष्ट्या अधिकाधिक सुरक्षित व निर्जंतुक रक्तपुरवठा करण्यासाठी महागडे केमिकल व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत असल्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या सेवाशुल्कात वाढ करणे अपरिहार्य आहे. शासनाने 1450 रुपयांची परवानगी दिली असली तरी सोलापूरच्या जनतेच्या हितासाठी सेवा शुल्कात कमीत कमी वाढ करण्यात आली आहे. सोलापुरात प्रति पिशवी 1200 रुपयांना मिळेल.
अशोक नावरे, व्यवस्थापक, दमाणी रक्तपेढी
शासनाने सुचवलेले दर (अशासकीय रक्तपेढीकरिता)
रक्ताचा प्रकार पूर्वीचे दर नवीन दर सोलापुरातील दर
संपूर्ण रक्त 850 1450 1200
पॅक्ड रेड सेल 850 1450 1200
फे्रेश फ्रोझन प्लाझमा 400 400 450
प्लेटलेट 400 400 450
सोलापुरातही या दरवाढीचा फटका बसला आहे. पूर्वी 850 रुपये प्रति पिशवी मिळणारे रक्त आता 1450 रुपयांना मिळत आहे. शासकीय रक्तपेढ्यांमध्ये 1200 व अशासकीय रक्तपेढ्यांमध्ये 1450 रुपये आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोलापुरात गेली आठ वर्षे रक्त पिशव्यांचा दर स्थिर होता.