आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्याचे कोलमडलेले नियोजन; दलदल, दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणरायाचे आगमन होत असतानाच शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांत ५५.०९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान शहरातील कचरा उलचण्याची मनपाची यंत्रणा तोकडी पडल्याने अनेक ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे अनारोग्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर पाणी साचणे, दलदल निर्माण होणे असे प्रकार शहरात दिसून येऊ लागले आहेत.

कचऱ्याचे ढीग अन् दलदल
शहरातपांजरापोळ चौक ते सम्राट चौक, रूपाभवानी रोड, शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील रस्ता, विद्या नगर, लष्कर, विजापूरवेस, टिळक चौक, हद्दवाढ भाग, कोंतम चौक, समाचार चौक, कुंभारवेस, बाळीवेस, कुमठा नाका आदी ठिकाणी कचरा अन् माती यामुळे दलदल निर्माण झाली आहे. रस्त्यावरून ये-जा करणेही अशक्य होऊन बसले आहे. वाहतुकीची कोंडीही होते आहे. काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील कॉलनीतील चेंबर भरून रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

मक्तेदाराचेनाही नियोजन, घंटागाड्या जप्तीची नोटीस
समीक्षाकन्स्ट्रक्शन कंपनीकडे शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता देण्यात आला आहे. पण त्यांचेही नियोजन कोलमडले आहे. त्यांनी घंटागाड्या घेण्यासाठी बँकेचे कर्ज काढले असून ते त्यांनी भरले नाही. त्यामुळे बँकेकडून त्या गाड्या जप्त करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. बँकेकडून शनिवारी त्यानुसार कारवाई होणार होती. पण, मनपाने हस्तक्षेप केल्यानी ती थांबवली गेली. गणपती उत्सवामुळे ‘समीक्षा’वरील संकट टळले असलेतरी शहरातील अनारोग्याचे संकट मात्र कायम राहिले आहे.
दमदार पावसामुळे शनिवारी मुलतानी बेकरी समोरील ब्रह्मदेव नगरात प्रशांत कुलकर्णी यांच्या घरात पाणी शिरले होते.
गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसाने दलदल निर्माण झाली आहे. सम्राट चौक ते रूपाभवानी रस्त्यावरील हे चित्र. वर्धमान नगर परिसरात नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात, महापालिकाही कचरा उलचत नाही त्यामुळे ही दलदल निर्माण झाली.
आठ दिवसांत अहवाल देणार
शहरातीलकचऱ्याबाबत मनपा स्थायी समितीत लक्षवेधी घेत स्थायी समिती सदस्यांनी जाब विचारला. कचऱ्याचे नियोजन आठ दिवसांत करून त्यांचा अहवाल स्थायीकडे सादर करावे असा आदेश देण्यात आले आहेत. बाबामिस्त्री, सभापती,स्थायी समिती महापािलका

आणखीदोन दिवस राहणार पाऊस
गेल्याचोवीस तासांत शनिवारी सकाळी वाजेपर्यंत सरासरी ५५ .०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवस दमदार पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसही अशीच िस्थती असणार असून ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस चालू राहणार आहे. रामचंद्रसाबळे, हवामानतज्ज्ञ़

कचऱ्यासाठीपर्यायी व्यवस्था उभारणार
समीक्षाकन्ट्रक्शन कंपनीचा मक्ता रद्द करण्यापूर्वी मनपास पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याने त्यानुसार तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांत तसे नियोजन करू. डॉ.पंकज जावळे ,सहाय्यक आयुक्तमहापालिका,सोलापूर