आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पीएच.डी.प्रकरणी प्राध्यापकाचा राजीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पीएच.डी. विकत आणणार्‍या प्राध्यापकांचे पोल खोल झाल्यानंतर सोलापुरातील अशा सात प्राध्यापकांपैकी एका प्राध्यापकाने सोमवारी राजीनामा दिला.

विद्या विकास प्रतिष्ठान संचलित व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकीतील प्राध्यापक डॉ. एस. एस. कात्रे यांनी राजीनामा दिला. सीएमजे विद्यापीठातील पीएच.डी. पदवी त्यांनी नुकतीच प्राप्त केली होती. यासंदर्भात बोलताना संस्थेचे सचिव अमोल चव्हाण म्हणाले, की त्यांच्या पदवीचा आणि राजीनामा देण्याचा संबंध नाही. त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे.

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकीचे प्रा. व्यंकटेश गड्डिमे, ए. जी. पाटील अभियांत्रिकीचे प्रा. बी.एस. कौलगी, वैराग अभियांत्रिकीचे प्रा. व्यंकटेश कुलकर्णी, हिराचंद नेमचंद वाणिज्यचे प्रा. सत्यजित शहा, के. एन. भिसे महाविद्यालयाचे प्रा. नामदेव गरड, शेळवे येथील कर्मवीर अभियांत्रिकीचे सुभाष मस्के यांनी मेघालय राज्यातील सीएमजे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतली आहे.