आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाचा खोटा दाखला, तीन महिलांना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ज्येष्ठ नागरिकाच्या बनावट दाखल्याच्या आधारे प्रवास करू पाहणार्‍या सोलापूरच्या तिघा महिलांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. कुर्ला रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. कविता सुरेंद्र जाधव (वय 35, रा. सेंटलमेंट), मीना रेवण गायकवाड (वय 50) व कृष्णाबाई सिंदू गायकवाड(वय 55, रा. तिघी सेटलमेंट) अशी त्यांची नावे आहेत.

मुंबईवरून परतण्यासाठी कविता जाधव आरक्षण तिकीट काढत होत्या. पस्तीशीच्या महिलेच्या ओळखपत्रात वय 65 लिहिलेले होते. संशय आल्याने आरक्षण केंद्रातील कारकूनने याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांना त्याब्यात घेतले. चौकशीनंतर तिच्या सोबत आणखी दोघी असल्याची माहिती पुढे आली. बनावट ओळखपत्र वापरल्याच्या कारणावरून तिघींना अटक करण्यात आली. अधिक तपासासाठी पथक सोलापूरला येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी धुमाळ (कुर्ला) यांनी सांगितले.