आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरामणी विमानतळासाठीच्या जमिनीचा मोबदला वसूल करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आषाढी वारी दरम्यान काढण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीच्या नावावर 23 लाखांचा निधी खर्ची टाकून गैरप्रकार केल्याचा घणघाती आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. जिल्हा परिषदेकडील चार पाझर तलावांची जमीन बोरामणी विमानतळासाठी ताब्यात घेऊनही मोबदला दिलेला नाही, तो वसूल करावा. वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी दिलेला लाखोंचा निधी अखर्चित ठेवल्यावरून सत्ताधारी सदस्यांनी थेट पदाधिकार्‍यांवर टीकास्त्र सोडले. आरोप-प्रत्यारोपामुळे मंगळवारची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात ही सभा झाली. सुरुवातीला सदस्य सुरेश हसापुरे यांनी आषाढी वारीदरम्यान काढण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीसाठी 23 लाख रुपये खर्ची पडले. त्यामध्ये 13 ते 15 लाख रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला.