आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बोरामणीच्या टेकऑफ’नंतर ‘होटगी’ बंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एअरपोर्ट अँथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून बोरामणी विमानतळ विकसित करण्याचा निर्णय झाल्याने त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, बोरामणीचे काम पूर्ण झाल्यानंतरच होटगी रस्त्यावरील विमानतळ व्यावसायिक कारणासाठी विकसित करण्यासाठी दिले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोरामणी विमानतळाच्या उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र, होटगी रस्त्यावरील विमानतळाची जागा व्यापारी कारणासाठी विकसित करून त्यातून सव्वाशे कोटी रुपये उभारून ते पैसे बोरामणीसाठी वापरायचे ठरले आहे.

होटगी विमानतळाच्या जागेच्या मालकी हक्काची मूळ कागदपत्रेच गहाळ झाली आहेत. त्यासंदर्भात अडचणी निर्माण होण्याची चिन्हे होती. पण, अगोदर बोरामणी विमानतळ विकसीत करणे आणि त्यानंतर होटगी रस्त्यावरील जागेसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करणे असे धोरण ठरल्याने आता कोणत्या अडचणी राहिलेल्या नाहीत. लवकरच बोरामणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.