आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोरामणी विमानतळाच्या उभारणीवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या बोरामणी विमानतळाच्या उभारणीला अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. त्यासाठी लागणारा निधी होटगी रस्त्यावरील विमानतळाची जागा विकसित करून व महाराष्ट्र 49 टक्के तर केंद्र सरकार 51 टक्के या प्रमाणात निधी उभारणार आहे.

गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोरामणी विमानतळ उभारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विमानतळ विकास प्राधिकरणाचा वाटाही निश्चित झाला. लवकरच हे काम सुरू होईल. होटगी रस्त्यावरील विमानतळाची जागा कर्मशिअल डेव्हलपमेंटसाठी वापरून त्यातून सव्वाशे कोटी उभारले जातील.’’ दिलीप सोपल, पालकमंत्री,


1 सध्या होटगी रस्त्यावरील विमानतळाचा विकास करण्यात अडचणी आहेत.
2 हे विमानतळ एअरपोर्ट अँथॉरिटी ऑफ इंडियाने ताब्यात घेतले आहे.
3 या विमानतळाच्या जागेची कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ झाली आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी विमानतळ जागेच्या मालकीहक्काचा विषय बाजूला ठेवून विमानतळाचा विकास करावा असे पत्र दिले आहे.
4 त्याला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही शिफारस दिली आहे. त्यामुळे बोरामणी विमानतळाचा मार्ग मोकळा होण्यास मदत झाली आहे.

एएआय 51 तर राज्य सरकार 49 टक्के
विमानतळ उभारणीसाठी लागणारा निधी होटगी रस्त्यावरील विमानतळाचा भूखंड व्यावसायिक कारणासाठी विकसित करून आणि उर्वरित निधी एअरपोर्ट अँथोरिटी 51 टक्के तर महाराष्ट्र प्राधिकरण 49 टक्के इतका खर्च करेल. होटगी रस्त्यावरील विमानतळाचा भूखंड विकसित करून 125 कोटी रुपये मिळतील असा व्यावसायिक मूल्य अहवाल आहे. त्याला आज मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यामुळे बोरामणी विमानतळाचे काम सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

संयुक्तपणे काम होणार
राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. त्यात सोलापूर आणि कोल्हापूर विमानतळाच्या उभारणीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एअरपोर्ट अँथॉरेटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण यांनी संयुक्तपणे काम करण्याचे निश्चित करण्यात आले.