आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Boramani Villagers Gave Sixteen And A Half Kg Silver For The SuvarnasidheSwar Temple

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोरामणी गावकऱ्यांनी दिली तब्बल साडेसोळा किलो चांदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सुवर्णसिद्धेश्वर मंदिरासाठी बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) गावकऱ्यांनी तब्बल साडेसोळा किलो चांदी दिली. देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी ती स्वीकारली. एकाच दिवशी १७ किलो ८९० ग्रॅम चांदी तर सुमारे दोन लाख रोख जमा झाले आहे.
‘दिव्य मराठी’ने सुवर्ण सिद्धेश्वर मंदिरची अभिनव संकल्पना मांडली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी समितीने पुढाकार घेतला आहे. दानशूर व्यक्तींना या कामी आवाहन केले. त्यानंतर सोने, चांदी रोख रकमेचा ओघ समितीकडे सुरू झाला.

चांदी देताना मंदिर समितीचे विश्वस्त महादेव चाकोते म्हणाले की, साडेसोळा किलो हा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात एकूण २५ ते ५० किलो चांदीचे उद्दिष्ट पूर्ण करू. यावेळी चिदानंद वनारोटे, महादेव शेळगे, अॅड. एम. के. पाटील, डॉ. कानेटकर, डॉ. यजुर्वेदी आदी उपस्थित होते.
चिपांच्या स्वरूपात दिली चांदी
बोरामणीच्या गावकऱ्यांनी चांदीच्या साडेपंचवीस नग चिपा समितीकडे िदल्या. यावेळी आप्पासाहेब जेऊरे, सिद्धाराम साखरे, भगवान भोसले, महादेव शेळगे, शिवानंद हुक्केरी, सैपन शेख, दऱ्याप्पा बिराजदार, पटणे कुटुंबातील सदाशिव, धोंडिबा, पंडित, विश्वनाथ, मल्लिनाथ, धर्मा, गुरुनाथ, शिवलिंग, प्रदीप, शंभूलिंग, सिद्धाराम बिराजदार, शंकर खोबरे, सैपन पटेल, राजकुमार हुक्केरी, शशिकांत आवटे, तिप्पण्णा करके, केदार शेळगे, सुरेश विभूते, बसण्णा पाटील आदी होते.
कर्मचाऱ्यांतर्फे एक दिवसाचा पगार
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला. लाख ५९ हजार ६६१ रुपयांचा धनादेश जमा केला. सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक बसवराज निंबर्गी यांनी रोख ४० हजार दिले.
वाढदिवस खर्चाला फाटा देऊन चांदी दान
अॅड.बाळासाहेब नवले यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून एक किलो चांदी दिली. यावेळी पत्नी अॅड. पद्मश्री नवले, मुलगा सुयश सोबत होते. नागेश गायकवाड यांनीही वाढदिवसाचा खर्च टाळून त्या रकमेची ३९ तोळे चांदी दिली. या वेळी एन. जी. प्रतिष्ठानचे राहुल हत्ती, दीपक थिटे, नामदेव लांडे, अर्जुन विभूते अभिलाष मुळे आदी उपस्थित होते.
सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियान
एकाच दिवशी सुमारे १८ किलो चांदी आणि दोन लाख रोख जमा
बाजार समिती कर्मचाऱ्याकडून एक दिवसाचा पगार दान
अॅड. नवलेंकडून किलो चांदी, तर नागेश गायकवाड मित्रपरिवारतर्फे ३९ तोळे चांदी भेट
समितीकडे एकूण ७१ किलो चांदी ६१ ग्रॅम सोने जमा झाले आहे
‘दिव्य मराठी’ने मांडली अमृतसर येथील मंदिराच्या धर्तीवर संकल्पना