आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावर्ती भागात आता नाकाबंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात गोंधळ होऊ नये. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती आदान-प्रदान करणे, सीमावर्ती भागात नाकाबंदी (चेकपोस्ट) सक्षम करण्यासाठी चर्चा झाली. शनिवारी सकाळी शासकीय विर्शामगृहात विजापूर, गुलबर्गा, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ,पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यावेळी संपूर्ण निवडणूक कालावधीत कशी काळजी घ्यायची यावर विचारमंथन झाले. निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ही बैठक ‘बॉर्डर बैठक’ म्हणून घेण्यात आली.
कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार, गुलबर्गा, विजापूर (कर्नाटक) विशेष पोलिस महानिरीक्षक एस. के. महमद, गुलबर्गा अधीक्षक अमितसिंग, विजापूरचे अधीक्षक रामनिवास शपथ, कोप्पलचे अधीक्षक रोहिणी शपथ, बीदरचे अधीक्षक सुधीरकुमार रेड्डी, उस्मानाबादचे अधीक्षक सचिन पाटील, सांगलीचे अधीक्षक दिलीप सावंत, सोलापूरचे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, अधीक्षक मकरंद रानडे यांच्यासह उपअधीक्षक , साहाय्यक आयुक्त (गुन्हे शाखा) या दर्जाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. वागदरी, मंद्रूप, मंगळवेढा, दुधनी या भागांत चार सीमावर्ती नाके आहेत. कर्नाटक-महाराष्ट्रात ये-जा करणारी वाहनांची तपासणी करणे, पैसे, शस्त्रे, संशयित व्यक्ती यांची तपासणी या नाक्यावर होणार आहे. एखाद्या गुन्हा करून कर्नाटकात जाणे अथवा तिकडून इकडे येणे असे प्रकार मागे घडले आहेत. सुमारे शंभरहून अधिक गुन्हेगारांची यादी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.