आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता धर्मा भोसले हटाव मोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - परिवहन समितीच्या जागेवर बीओटी प्रकल्प राबविण्याला काँग्रेस शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी विरोध केला आहे. ही भूमिका पक्षाची नसून ती त्यांची वैयक्तिक आहे, असे सांगत काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी पत्रक काढले आहे. शहराध्यक्षच विकासाला खिळ घालत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या संदर्भातील निवेदनावर सरचिटणीसांसह 20 प्रमुख पदाधिकार्‍यांनी भोसले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बीओटी अंमलबजावणीवरून सत्ताधारी पक्षातच दोन गट पडल्याचे उघड झाले आहे. भोसले यांनी लेखी पत्रक देऊन बीओटीला विरोध केला होता. त्याचे पडसाद आता काँग्रेसमध्ये उमटू लागले आहेत. पक्षाचे सरचिटणीस राजन कामत, केशव इंगळे, अजय दासरी, फारूख कमिशनर, सचिव अशोक चव्हाण, अरुण साठे, शिवाजी कदम, खजिनदार दिनेश जाधव, उपाध्यक्ष किसन मेकाले, गुलाब बारड तसेच उमेश सुरते, यशवंत ढेपे, इम्तियाज अल्लोळी, शकील मौलवी, राहुल गायकवाड, विश्वनाथ साबळे, मुश्ताक बेन्नीशिरूर, अविनाश जाधव, मधुकर कोरे आदींच्या सह्या निवेदनावर आहेत. परिवहनची अवस्था बिकट आहे. परिवहन बंद पडून कामगार देशोधडीला लागतील अशी भीती व्यक्त होतेय, असे असतानाही परिवहनच्या विकासाला खिळ घालण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यात करण्यात आली आहे.

पक्षाध्यक्ष म्हणून काय केले?
शहरात पाणीपुरवठा तीनदिवसांआड होतोय, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, शहरातून जडवाहतूक स्रुूच आहे, विरोधी पक्ष काँग्रेसवर व नेत्यांवर शहरात येऊन सतत टीका करताहेत, अशा प्रसंगात पक्षाध्यक्ष म्हणून भोसले यांनी कोणती भूमिका घेतली?’’ केशव इंगळे, सरचिटणीस, शहर काँग्रेस

राजीनामा द्यावा
काँग्रेस पक्षात सध्या कोणत्याच बैठका होत नाहीत. समन्वय समितीची, फ्रंटल, सेलची बैठक झाली नाही. मग धर्मा भोसले यांनी कोणाला विचारून बीओटीला विरोध असल्याचे पत्र दिले? त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे.’’ राजन कामत, सरचिटणीस

निम्म्या सह्या बोगस
आरोप चुकीचे आहेत. बीओटीला विरोध केला नाही. जागेचे भाव वाढले आहेत, त्यामुळे फेरटेंडर काढावे, जेणेकरून परिवहनचा फायदाच होईल. 20 लोकांच्या सह्या आहेत, त्यातील काहीजण पदाधिकारीच नाहीत, निम्म्यापेक्षा जास्त जणांनी सही केली नसल्याचे आम्हाला सांगितले आहे.’’ धर्मा भोसले, शहराध्यक्ष, काँग्रेस