आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीपीएल’ला फटका;मात्र ‘एपीएल’ कुटुंबांची चांदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रति व्यक्ती मासिक 5 किलो धान्य तेही माफक दराने देण्याच्या अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून होत आहे. 10 सदस्यसंख्या असलेल्या कुटुंबास केवळ 100 रुपयात पोतंभर धान्य (30 किलो गहू व 20 किलो तांदूळ) मिळणार आहे. शहरातील लोकसंख्येपैकी 4 लाख 52 हजार लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळणार आहे. लहान ‘बीपीएल’कुटुंबांना मात्र सदस्य संख्येवर धान्य मिळणार असल्याने फटका बसणार आहे.

अन्नसुरक्षा विधेयकासाठी शहरातील एपीएलमधील 2 लाख 70 हजार 51 नागरिक पात्र ठरले. शिवाय बंद मिल कामगार असलेले 23 हजार 82, विडी कामगार 65 हजार 109 तर विशेष प्रवर्गातील 179 असे एकूण 88 हजार 370 लाभार्थी पात्र ठरले. बंद मिल, विडी कामगार व एपीएलमधील लाभार्थी असे दोन्ही मिळून 3 लाख 58 हजार 421 नवीन लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळणार आहे.

अंत्योदय गटातील 23 हजार 959 लोकांना 2 हजार 522 किलो धान्य लागेल. बीपीएलच्या 69 हजार 627 लाभार्थ्यांना 3 हजार 481 किलो धान्य तर बंद मिल कामगार, विडी कामगार व एपीएल पात्र लाभार्थी असलेल्या 2 लाख 70 हजार 51 लाभार्थ्यांना 17 हजार 921 किलो धान्य लागणार आहे. अन्नसुरक्षा विधेयकाच्या 4 लाख 52 हजार पात्र लाभार्थ्यांसाठी 23 हजार 924 किलो धान्य लागणार आहे.

लोकसंख्या व लागणारे धान्य
प्रत्येक दुकानदारांनी धान्याची उचल केली आहे. शहरातील 2 लाख 70 हजार लोकांना याचा नव्याने लाभ मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार व दिलेल्या किमतीनेच वाटप करावे यामध्ये काही गडबड केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. दिनेश भालेदार, अन्नधान्य वितरण अधिकारी.

गडबड झाल्यास कारवाई

गहू दोन तर तांदूळ तीन रुपये किलो
अन्नसुरक्षा विधेयकामुळे पात्र लाभार्थ्यांना गहू 2 रुपये किलो तर तांदूळ तीन रुपये किलो दराने मिळणार आहेत. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कार्ड 35 किलो धान्य मिळणार आहे तर बीपीएल कुटुंबाला मात्र सदस्यसंख्येवर धान्य उपलब्ध होणार आहे. यापूर्वी एका शिधापत्रिकेस 35 किलो धान्य मिळत होते. कुटुंबातील सदस्यसंख्या 2 ते 6 असेल तर कुटुंबास कमी धान्य मिळणार आहे. एपीएलधारकांना फायदा होईल.

झोन लोकसंख्या धान्य

  • अ झोन 71, 129 3,643 किलो
  • ब झोन 65,995 3,632 किलो
  • क झोन 1,84,52 9, 659 किलो
  • ड झोन 1,30,851 9,907 किलो