आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीपीटी जोडणीमुळे शहराला मेपर्यंत चार दिवसांआड पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या टाकळी- सोरेगाव जलवाहिनीवर नांदणीजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या बीपीटी(ब्रेक प्रेशर टॅक) चे जोड घेण्याचे काम बुधवार (दि. २९)पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे औज बंधाऱ्यातून शहरासाठी होणारा पाणीपुरवठा ३० तास खंडित होणार आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होणार असून मेपर्यंत शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.

बीपीटी जोडबरोबरच या जलवाहिनीवर असलेल्या १३ ठिकाणच्या गळती दुरुस्तीचे कामही याच वेळी करण्यात येईल. २९ एप्रिल ते मे या कालावधीत हे काम चालेल. या कामासाठी दोन मक्तेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे उपअभियंता कामावर लक्ष ठेवून लवकर काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या कामामुळे शहरात विशेषत: विडी घरकुल, अक्कलकोट रोड, जुळे साेलापूर या भागात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी मागणी केल्यास झोन कार्यालयाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मेनंतर पुरवठा सुरळीत होईल, असे आयुक्त म्हणाले.

अन्य अडचण येण्याची शक्यता
बीपीटीजोड देण्याची तयारी महापालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. बीपीटीला जोड दिल्यानंतर टाकळीतील चौथा पंप सुरू करण्यात येईल. त्यामुळे १५ एमएलडी पाणी वाढेल, पण पाण्याच्या प्रेशरमुळे ती जलवाहिनी १९६५ मधील असल्याने फुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यायी यंत्रणा महापालिकेने उभी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

एनटीपीसी जलवाहिनीसाठी सहा जणांची कमिटी
२६डिसेंबर २०१४ रोजी एनटीपीसीसोबत जलवाहिनीसाठी मनपाचा करार झालेला आहे. या करारानुसार एनटीपीसी मनपास २५० कोटींसह वाढीव रक्कम देणार आहे. या रकमेच्या नियोजनासाठी सहा जणांची कमिटी गठित करण्यात आली. त्यात मनपाचे तीन आणि एनटीपीसीचे तीन अधिकारी असणार आहेत. ही कमिटी २० दिवसांत अहवाल देणार असल्याचे मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले. यासाठी सोमवारी एनटीपीसी येथील प्रकल्पस्थळी मनपा आयुक्त काळम-पाटील आणि एनटीपीसीचे प्रबंधक राॅय यांची बैठक झाली. त्यात समिती गठित करण्याचा निर्णय झाला.

१५ एमएलडी पाणी वाढणार
नव्यानेबांधण्यात आलेल्या बीपीटीची जोड घेतल्यानंतर १५ एमएलडी पाणी वाढणार आहे. त्यामुळे शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.

दुरुस्ती काम आजपासून
बुधवारीसकाळी वाजता टाकळी येथील पंप बंद करण्यात येईल. पाच ते सहा तास पाइपलाइन रिकामे झाल्यावर वेल्डिंगचे काम सुरू करण्यात येईल. सुमारे ३० तास काम सुरू राहील. रात्री उशिरापर्यंत काम संपेल. त्यानंतर पंप सुरू करण्यात येईल. जेसीबी, वेल्डिंग मशीन, जनरेटर आदींसह ५० मजूर या कामासाठी तैनात करण्यात आले आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
शहरातीलपाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी बीपीटी बांधण्यात आले असून, त्याच्या जोडचे काम मनपाने हाती घेतले आहे. वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मे पर्यंत चार दिवसांआड पाणीपुरवठा हाेईल. विजयकुमारकाळम-पाटील, मनपा आयुक्त