आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्तनपान सप्ताह विशेष: सुरक्षित स्तनपान म्हणजे बाळाला आरोग्याचे कवच कुंडल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मातेच्या कुशीत विसावलेल्या बाळाला सुरक्षित दूध पाजणे म्हणजे बाळाला आरोग्याचे कवच कुंडल देण्याजोगे आहे. माता आपल्या बाळाला सुरक्षित स्तनपान करते. तिच्या बाळाला साथीचे रोग व इतर छोट्या-मोठय़ा आजारांपासून सुरक्षित ठेवता येते. मातांना बाळ आजारी का पडले हे माहिती नसते. ते आजारी पडू नये म्हणून बर्‍याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यात मातेचे कपडे, बाळासाठी वापरले जाणारे कपडे, मातेची स्वत:ची स्वच्छता असे अनेक प्रकार आहेत.

बाळांवर होणारे परिणाम
बाळालामातेचे दूध नाही दिले तर कुपोषण, बालदमा, वारंवार अतिसार, न्यूमोनिया आदी आजार वारंवार होतात. त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. याचा प्रतिकूल परिणाम त्याच्या सामान्य वाढीत होतो. ती मानसिक दृष्ट्या थोडीशी कमकुवत होतात. चुणचुणीतपणा असण्याचे प्रमाणही कमी असते.

निसर्गाचे वरदान
बाळाला रोगप्रतिकार शक्ती मातेच्या दुधातून मिळते. ते दूध निर्जंतूक असते. रोगांचा प्रादुर्भाव होण्याची संधीच मिळत नाही. मातेचे दूध हे पचनाला हलके असते. जशी बाळाची वाढ होते, तशी दुधाची क्षमता वाढते. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही.
- डॉ. शशिकांत गायकवाड, बालरोग तज्ज्ञ

स्वच्छतेमुळे बालक निरोगी राहतील
मातेने आपल्या स्वच्छतेला महत्त्व द्यावे. नखे कापावीत. त्यातून बाळाला धोका पोचू शकतो. काम करण्याआधी व नंतर हात स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यामुळे रोगांना आळा बसणे शक्य आहे.
- डॉ. सुवर्णा बासुतकर, अध्यक्ष, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना

बाळास दूध पाजताना ही घ्या काळजी
0 मातेने हात-पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.
0 बाळाच्या अंगाखाली मध्यम आकाराची उशी ठेवावी.
0 सुती कपड्यांच्या साड्या अथवा गाऊन वापरावेत.
0 शांत, पुरेसा प्रकाश असलेल्या ठिकाणी बसावे.
0 पाहुण्याच्या हातात थेट बाळाला देऊ नये.
0 ये-जापासून लांब बसून दूध पाजावे, संसर्ग होणार नाही