आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मातेचे दूध मिळालेली मुले इतर मुलांपेक्षा चुणचुणीत’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मातेचे दूध पिणारी बाळे रोगांना प्रतिकार करणारी व इतर बाळांपेक्षा संतुलित व चुणचुणीत असतात, असे मत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीषा पाटील यांनी व्यक्त केले.

‘दिव्य मराठी’ व राष्ट्रवादी युवती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्तनपान सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने रविवारी शोभा नर्सिंग होम येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रतिभा पाटील, संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

डॉ. पाटील पुढे म्हणाल्या, की आताची सामाजिक स्थिती ही वेगळी आहे. स्त्री करिअर करण्यासाठी बाहेर पडते. ती अनेक अडचणींना तोंड देते. त्यामुळे तिची मानसिकता ही ताणाची असते. त्याचा परिणाम होतो. सायली शेंडगे हिने सूत्रसंचालन केले. रेणुका मिठ्ठा हिने आभार मानले.

डॉ. प्रतिभा म्हणाल्या..
बाळंतपणात मातेचा आहार हा सकस आणि चवीचा असावा. मीठ, तिखट कमी, अगदी तुपकट, आळणी पदार्थ न देता तिला चांगला स्वादिष्ट, पौष्टिक आहार द्यावा.
बाळाला दूध पाजल्यानंतर त्याला खांद्यावर घेऊन थापटावे. त्याची ढेकर काढावी. त्याने रडल्यानंतर केवळ भूक लागली आहे असा अंदाज न करता त्याला नेमके काय हवे हे जाणून घ्यावे. दूध पाजण्यासाठी बसताना आपल्या अंगाचा भार हा बाळावर टाकू नये.

डॉ. मनीषा म्हणाल्या..
बाळाशी भावनिक बंध जोडायचे असेल तर त्याला मातेने दूध देणे गरजेचे.
योग्य नियोजन व आराम हवा. सकारात्मक विचाराने दूध नाही, असे म्हणणे टाळावे.
पहिले 6 महिने केवळ आईचे दूध. पुढील दोन वष्रे पूरक आहारासह मातेचे दूध दिलेच पाहिजे.
कांगारू थेरेपीने आईच्या शरीरात मायेचा पाझर आपोआप वाहतो.
दूध देताना मातेने हात-पाय स्वच्छ धुवावेत, आदर्श स्थितीत बसावे.