आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Brestfeeding Is Good For Baby And Mothers Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेणबत्त्या पेटवून महिलांनी घेतली स्तनपान प्रचार-प्रसाराची शपथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मातेचे दूध हे बाळासाठी आयुष्यभराची शिदोरी असते. त्याला जन्माला घातल्यानंतर दूध देणे हे प्रत्येक मातेचे परमकर्तव्य आहे. ते प्रत्येकीने पार पाडणे गरजेचे आहे, हा संदेश घेऊन शहरातील विविध महिला मंडळे, भजनी मंडळे, सेवाभावी संस्थांनी दैनिक दिव्य मराठीच्या ‘स्तनपान सप्ताह अभियानात’ सहभाग नोंदविला. सायंकाळी सहा वाजता चार हुतात्मा पुतळा चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महापौर अलका राठोड आणि त्यानंतर प्रत्येकीने मेणबत्त्या लावून ‘स्तनपानाचे महत्त्व’याच्या प्रचाराची शपथ घेतली.

यांनी नोंदवला सहभाग

साहित्यिक शोभना सागर, फॅशन डिझायनिंग इस्टिट्यूटच्या कामिनी गांधी, किरीटेश्वर महिला मंडळाच्या सुहासिनी शेटे, अक्कनबळग भजनी मंडळ, राजेश्वरी शिलवंत, कस्तुरा कांबळे, फातिमा नदाफ, आशा बनसोडे, राष्ट्रवादी युवती संघटना, राष्ट्रवादी महिला संघटना, लता ढेरे, मृणाल शिंदे, हॅलो मेडिकल फाउंडेशन, भगिनी समाजमधील महिलांनी सहभाग नोंदवला. जिजाऊ ब्रिगेडच्या मनीषा नलावडे, अभिंजली जाधव, नंदा शिंदे, संगीता हुल्लेरकर, नीलिमा पप्पुल, जयर्शी गायकवाड, दीपाली नंदूरकर, अँड. सारिका तमशेट्टी तसेच सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन सहसचिव स्वाती बिराजदार यांच्यासह युवती व महिलाही सहभागी झाल्या होत्या.

स्तनपान शिशूंसाठी सर्वोत्तम आहार

मातेचे स्तनपान हे महत्त्वाचेच आहे. आम्हीही आमच्या परीने या अभियानात खारीचा वाटा नक्कीच उचलणार आहोत.
नीलिमा पप्पुल

मातेचे दूध अमृतासमान असते. पहिल्या दुधाने बालकात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होत असते.
सुहासिनी शेटे

जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई वेषातील बालिका
भावी मातांनीही सहभाग नोंदवला. लहानपणापासूनच हा विचार स्त्रीमनावर बिंबावा यासाठी अमिषा आणि मनाली जाधव या बालिकांनी माता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाईचा वेष परिधान करीत अभियानात सहभाग नोंदवला.

दैनिक दिव्य मराठी नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढे असते. हा उपक्रम खूपच चांगला आहे.
संगीता हुल्लेरकर

शासन तसेच बर्‍याच संस्था लोकजागृती करत आहेत. ग्रामीण भागातही असे उपक्रम व्हावेत असे वाटते.
दीपाली नंदूरकर