आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता महापालिकेवर युतीची सत्ता आणा! शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार शेवाळे यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील दोन प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून कौल दिला. सार्वत्रिक निवडणुकीत महापालिकेवर भाजप-शिवसेना युतीची सत्ता आणा. या शहराचा कायापालट करू, अशी ग्वाही शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

प्रभाग १८ मधून शिवसेनेच्या वतीने निवडून आलेल्या महेश कोठे यांचा नागरी सत्कार रविवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलमध्ये हा कार्यक्रम झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अशोक ढोणे, रिपब्लिकन पक्षाचे प्रमोद गायकवाड अादी मंचावर होते.

खासदार शेवाळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचारामुळेच काँग्रेस देशातून सपाट झाला,असेही ते म्हणाले. सत्कारसमारंभावेळी व्यासपीठावरील उपस्थितांचा भार पेलवला नाही, अन् काही फळ्या कोसळल्या.

कोठेंमुळेच शिंदे मोठे
काँग्रेसच्या राजकारणात अत्युच्च पदावर गेलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना महेश कोठे यांच्या वडिलांनीच मोठे केले. त्यांच्यामुळेच शिंदे प्रत्येक निवडणुकीत विजयी झाले. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेंचे दिवस संपले. राहुल शेवाळे, खासदार

मी पैसे वाटत नसतो
विडी घरकुल भागात पाच वेळा निवडून आलो. पैसे कधीच वाटले नाहीत. पोटनिवडणुकीत काँग्रेसने प्रचंड पैसा वाटला. तरीही मतदारांनी त्यांना नाकारले. कारण येथील मतदारांना फक्त विकास हवा अाहे. महेश कोठे, नगरसेवक

बातम्या आणखी आहेत...