आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून खून; भावाला पाच वर्षे शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू झाला.याप्रकरणी न्यायालयाने मोठ्या भावास पाच वर्षाची शिक्षा आणि एक लाख दहा हजार रुपये दंड ठोठावला. तसेच भावजय आणि पुतण्याची सुटका करण्यात आली. भारत जगन्नाथ गरड (वय ४५, रा. रानमसले) असे मृताचे नाव आहे. ही घटना ३० नोव्हेंबर २०१२ रोजी रानमसले येथे घडली होती.

इंद्रजित जगन्नाथ गरड (वय ५०, रा. रानमसले) पत्नी उज्वला आणि मुलगा प्रवीण हे तिघे मिळून सहा गुंठ्याच्या जागेवर संरक्षक भिंतीचे काम करून घेत होते. त्यावेळी मृत भारत जगन्नाथ गरड (वय ४५, रा. रानमसले) यांनी त्यास हरकत घेतली. यावर चिडून इंद्रजित यांनी दंडुक्याने भारत यांच्या डोक्यावर मारले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नीने आरडाओरड करून लोकांना जमवले. सर्वांनी मिळून त्यांच्यावर वडाळा येथे उपचार केले. पुढील उपचार सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भारत यांचा मृत्यू झाला होता.आरोपीकडून अ‍ॅड. धनंजय माने यांनी तर सरकार पक्षाकडून अ‍ॅड. पी.बी. शेंडे यांनी काम पाहिले.