आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bsf, Boarder Security Force Get Land For Training Center

बीएसएफ, सीमा बलास मिळणार जागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागेवर बीएसएफच्या प्रशिक्षण केंद्रासाठी तर हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे सशस्त्न सीमा बलाची बटालियन उभारण्यासाठी जागा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गुरुवारी मुंबई येथे महसूल विभागाचे सचिव स्वाधीन क्षत्निय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

टाकळी येथे बीएसएफचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 77.19 एकर जमिनीची मागणी अधिकार्‍यांनी केली होती. ही जमीन वनविभागाची असल्याने जमीन संपादनासंबंधीचा प्रस्ताव केंद्रसरकारकडे पाठवण्यात आला आहे. महिनाभरात यावर निर्णय अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले. बुधवारी हन्नूर येथील जमिनीची सशस्त्न सीमा बलाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली होती. अधिकार्‍यांनी जागा अंतिम केल्याने जागा देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासंबंधी आठवडाभरात जमीन संपादनाविषयी आदेश निघतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. या प्रकल्पासाठीही 77.19 एकर जमीन लागणार आहे.

चार वर्षांत चार प्रकल्प
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसाठी एनटीपीसी व विमानतळ हे दोन आंतरराष्ट्रीय प्रकल्प मंजूर करून घेतले. आता बीएसएफचे प्रशिक्षण केंद्र व सशस्त्र सीमा बलाच्या जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.