आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विविध मागण्यांसाठी संघटन मजबूत करा, बीएसएनएल कर्मचा-यांचे केंद्रीय अधिवेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बीएसएनएलमधीलएससी - एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करायच्या असतील तर , सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करा, असे प्रतिपादन अखिल भारतीय एससी-एसटी संघटनेचे अध्यक्ष डॉ. उदीत राज यांनी केले.
बीएसएनएलच्या एससी-एसटी एम्लॉय वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दोन दिवसाचे केंद्रीय अधिवेशन गावडे मंगल कार्यालयात डॉ. उदीत राज महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. या वेळी बीएसएनलचे प्रबंधक शिवशंकर झा असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. डी. राम महाराष्ट्र सर्कलचे सचिव सुनील सोनवणे, तमिळनाडूचे सर्कल सचिव तेरामले, आध्रंप्रदेशचे सर्कल सचिव हणमंत राव, सोलापूर असोएशनचे अध्यक्ष संतोष सरवदे, सचिव ए. एल. सिद्धगणेश आदी उपस्थित होते.
उदीत राज म्हणाले की, एससी -एसटी कर्मचारी सध्या विखूरलेल्या स्वरूपात आहे. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून आपण यशस्वी होत नाही. त्यासाठी आपले संघटन मजबूत करून एससी-एसटी कर्मचाऱ्यांच्या आरक्षण, पदोन्नती, सोयीसुविधा, बिंदूनामावली या मागण्या मान्य करून घेऊ शकतो. अनुकंपाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विभक्त होऊन लढण्यासाठी एकत्र येऊन लढण्यासाठी आवाहन केले. आज एससी - एस.टी कर्मचाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात निवडणूक होणार आहे.बीएसएनएलच्या एससी-एसटी एम्लॉय वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गावडे मंगल कार्यालयात केंद्रीय अधिवेशनाचे उद्घाटन महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते झाले.
समाजाचा विकास करा
एससी- एसटी कर्मचारी सध्या विभक्त स्वरूपात काम करत आहे. त्यामुळे मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.'' सुशीलाआबुटे, महापौर