आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवसाआड पाण्यासाठी बसपचा मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराला दोन दिवसांनंतर होणार पाणीपुरवठा एक दिवसानंतर करावा यासाठी बहुजन समाज पक्ष महापालिका येथे बुधवारी मोर्चा नेणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अँड. संजीव सदाफुले यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितली. शहारातील पाणी टंचाई महापालिकेच्या सदोष नियोजनामुळे असून त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

अँड. सदाफुले म्हणाले, ‘‘मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होईल. हा मोर्चा सम्राट चौक, शिवाजी चौक, मेकॅनिकी चौक, चार पुतळा चौक मार्गे महापालिका प्रवेशद्वारसमोर येईल. त्यानंतर तेथे सभा होईल. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाचक आहे. नागरिकांकडून बारमाही पाणी देतो म्हणून पैसे वसूल करून फक्त 160 दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. जलशुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होता. नियोजनाच्या अभावामुळे कृत्रिम पाणीटंचाई सुरू असून त्या विरोधात पक्षातर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे,असेही ते म्हणाले.
या वेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, उषा शिंदे, सुनीता भोसले, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, जिल्हा महासचिव उपगुप्त चौधरी यांच्यासह बसपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.