आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपाच्या एका मतामुळे विरोधी भाजपला मिळाले सभापतिपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवारीपार पडलेल्या झोन समिती सभापती निवडणुकीत काँग्रेसला सहा, राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. झोन क्रमांक मध्ये बसपाच्या नगसेविका सुनीता भोसले यांनी भाजपला मत टाकल्याने बहुमत असतानाही या ठिकाणी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. या ठिकाणी भाजपचे अविनाश पाटील यांना सभापती पदाची लॉटरी लागली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी ही निवड जाहीर केली. झोन क्रमांक दोनच्या निवडणुकीत मोठा फेरबदल पाहण्यास मिळाला. या झोनला काँग्रेसचे आठ, भाजपचे चार, शिवसेना, रिपाइं, बसपा असे एक सदस्य आहेत. काँग्रेसचे महेश कोठे यांचे नगरसेवक पद रद्द झाले तर दमयंती भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे सदस्य संख्या पाचवर आली.

नगरसेविका श्रृती मेरगु यांना गैरहजर ठेवण्यात भाजपला यश आल्याने भाजप तीन, रिपाइं, शिवसेना मिळून पाच सदस्य झाले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपकडे समान मते झाली. मतदानात बसपाच्या सुनिता भोसले यांनी भाजपला मतदान केल्याने अविनाश पाटील विजयी झाले.

भाजपची फील्डिंग
मागीलवर्षी भाजपला क्रमांक एकचे झोन सभापतिपद देण्यात आले होते. यंदा मात्र काँग्रेसने सभापतिपद देण्यास नकार दिल्याने भाजपकडून झोन क्रमांक दोन मधील कमकुवतपणाचा फायदा उचलण्यासाठी फिल्डिंग लावली. सभापती निवडीच्या मतदान प्रक्रियेवर भाजपचे सरचिटणीस प्रा. अशोक निंबर्गी लक्ष ठेवून होते.

नगरसेविका श्रृती मेरगू यांना व्हीप बजावले असताना त्या गैरहजर राहिल्या. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात येणार आहे.” संजयहेमगड्डी, महापालिका सभागृह नेता, काँग्रेस पक्ष
मागील वर्षात झोन नंबर एकचे समिती सभापती पद दिले. पण यंदा त्यास काँग्रेसने नकार दिला. त्यामुळे निवडणूक लागली. सत्ताधाऱ्यांनी निधी देण्यात दुजाभाव केल्याने बसपाने राग व्यक्त केला.” प्रा.अशोक निंबर्गी. भाजप नगरसेवक

बसप नगर-सेवकांना निधी देताना दुजाभाव केला. याचा राग आज व्यक्त झाला. राग व्यक्त करण्यासाठी आमच्या सदस्यांनी मतदान केले.” आनंदचंदनशिवे, गटनेता माकपा, बसपा

रिपाइं आणि बसपा हे आंबेडकरवादी विचाराने चालणारे आहेत. मात्र, त्यांनी भाजपला मतदान केले. श्रृती मेरगू यांना व्हीप बजावले असताना त्या गैरहजर राहिल्याने पराभव झाला.” अविनाशबनसोडे, काँग्रेस नगरसेवक

काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा
येत्यादोन वर्षांत मनपा निवडणुका होणार आहेत. राज्य पातळीवर राष्ट्रवादीने भाजपशी साधलेली जवळीक पाहता आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. शहरात मुस्लिमबहुल भागात वाढत असलेला एमआयएम पक्ष, तसेच झोन समितीत बसपाने भाजपला केलेले मतदान पाहता आगामी काळात मनपा सत्तेत येण्यासाठी भाजपला बसपाने साथ दिल्यास आश्चर्य नाही.

विषय समितीत निवड आजपासून
मनपामहिला बालकल्याणसह सात विषय समितीची निवड प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे. सात समितीपैकी आरोग्य समिती भाजपने मागितली आहे.भाजपच्या मागणीबाबत काँग्रेस काय भूमिका घेणार पाहावे लागणार आहे. सातपैकी महिला बालकल्याण समितीसाठी अश्विनी जाधव, सारिका सुरवसे, संजीवनी कुलकर्णी इच्छुक आहेत. आराेग्य समितीसाठी काँग्रेसकडून राजकुमार हंचाटे, भाजपकडून नागेश वल्याळ इच्छुक आहेत.

वड्डेपल्लींचा अर्ज बाद तर अंजिखाने यांची माघार
झोनक्रमांक तीनसाठी भाजपचे विजया वड्डेपल्ली अर्ज भरताना गैरहजर होत्या. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरवला. याठिकाणी नगरसेविका वेदमती ताकमोगे बिनविरोध निवडून आल्या, तर प्रभाग क्रमांक आठसाठी भाजपचे सुरेखा अंजिखाने यांनी माघार घेतल्याने फिरदोस पटेल बिनविरोध झाल्या.