आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

41 बैलजोडींची उत्साही मिरवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कारहुणवीनिमित्त कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीने सामुदायिकरीत्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली. कसबा गणपतीच्या पूजेनंतर बैलजोड्यांचे पूजन झाले. या वेळी पालिका सभागृह नेते महेश कोठे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, सोमनाथ भोगडे, महेश हब्बू, मल्लिनाथ मसरे, प्रकाश वाले, नंदकुमार मुस्तारे, राजेश पाटील यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष बसवराज गाबणे, तिम्मप्पा हंडे, तम्मा मसरे, आप्पासाहेब कुताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. कोठे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू आहे. शेती करताना आधुनिक पद्धतीचा वापर केला तर आणखी प्रगती साधता येते आणि उत्पन्न वाढीस मदत मिळते, असे ते म्हणाले.

यावेळी अनिल गुंगे व शिवबा शहापूरकर या शेतकर्‍यांना विक्रमी पिकांसाठी गौरवण्यात आले. शेतगडी नारायण गवळी आणि खंडू शहापूरकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आबासाहेब गुंगे, शिवानंद दर्गोपाटील, केदार हब्बू, संदेश भोगडे, विजय कल्लूरकर, अनिल आकाडे, सोमनाथ गुंगे, किरण मेंगाणे, अनिल मसरे, बसवराज गाबणे, विलास तंबाके यांच्यासह नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

डौलदार 41 बैलजोड्या
मिरवणुकीत 41 बैलजोड्या सहभागी झाल्या. प्रत्येकास पिवळ्या रंगात रंगवलेले होते. शिंगांना वेंगूळ, बाशिंग आणि शेंडे लावण्यात आले होते. सनई चौघड्याच्या निनादात ही मिरवणूक निघाली.