आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस जाळण्याच्या प्रकरणी पंचवीस अज्ञातांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोरेगाव चौक परिसरात व्हीव्हीपी कॉलेज बसच्या चाकाखाली सापडून जागीच मुलगा ठार झाल्याप्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड करीत कॉलेजची अपघाती बस पेटवून दिली होती. याप्रकरणी 20 ते 25 अज्ञातांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अज्ञातांचा तपास सुरू केला आहे. दरम्यान मुलास चिरडणार्‍या वाहन चालकाची जामिनावर सुटका झाली आहे. राहुल भैरप्पा म्हेत्रे असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. 2 ऑगस्ट रोजी शेवटचा र्शावणी सोमवार असल्याने शाळा लवकर सुटली होती. संध्याकाळी ट्युशनला जात असताना रस्ता ओलांडताना हा अपघात घडला. अपघात घडताच येथे जमा झालेल्या जमावाने संतप्त होऊन बसची तोडफोड केली आणि बस जाळून टाकली. याबाबत त्या बसचा क्लिनर नागेश इरण्णा परीट याने विजापूर नाका पोलिस ठाण्यात 20 ते 25 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विकास रामगुडे यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

रफिक शेख (वय 33, रा. मजरेवाडी) या बसचालकास अटक करून 3 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी रफिक शेख यास 15 हजार वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

जातमुचलक्यावर जामीन
अपघातामध्ये मुलाचा मृत्यू झाल्यानंतर बसचालक रफिक शेख यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.