आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Businessman Arrest In Cheq Bounce Case In Barshi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनादेश न वटल्याने व्यापार्‍यास शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - धनादेश न वटल्याप्रकरणी लातूर येथील व्यापार्‍यास सहा महिने सश्रम कारावास तसेच ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने ठोठावली. यादव किशनराव बरकते असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यापार्‍याचे नाव आहे.

बार्शी येथील विजय नरसिंह कुलकर्णी यांचा पेजर सिस्टिमचा व्यवसाय होता. बरकते व कुलकर्णी यांच्यामध्ये वर्ष २००० मध्ये व्यवहार झाला. व्यवहारापोटी ठरलेल्या रकमेपैकी काही रक्कम बरकते यांनी रोख देऊन कालांतराने त्यांनी कुलकर्णी यांना धनादेश दिला. कुलकर्णी यांनी तो खात्यामध्ये जमा केला असता बरकते यांच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणामुळे तो वटला नाही. खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही धनादेश देऊन फसवणूक केली म्हणून कुलकर्णी यांनी बरकते यांना नोटीस पाठवली. त्यानंतर १५ दिवसांत रक्कम न दिल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता.