आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोक गणनेसाठी प्रगणकांना प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माळढोकची घटती संख्या पाहता गणनेतून माळढोक वगळले जात असावेत, या शंकेपोटी आता वर्षातून तीन वेळा माळढोकची गणना होणार आहे. गत गणनेवेळी अभयारण्य परिक्षेत्रात तीन माळढोक आढळून आले होते. या वर्षातील पहिली गणना 11 ते 13 जुलै असे तीन दिवस होईल. पूर्वी एकच दिवस गणना होत असे. याबाबतची माहिती मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पुणेचे सुनील लिमये यांनी दिली.
नान्नज येथील विर्शामगृहात माळढोक गणनेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांसाठी खास प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यानिमित्त र्शी. लियमे संवाद साधत होते. या वेळी माळढोक अभयारण्यात 35 पॉइंट तर करमाळा तालुक्यातही पाच पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी तीन दिवस राहून माळढोकची गणना होईल. या वेळी प्रगणक कॅमेरा, बायनॅक्यूलर आदींसह निरीक्षणे घेतली. माळढोकमधील नर-मादी कसे ओळखावेत, त्यांची आहार पद्धत आदींसह विस्तृत माहिती या प्रशिक्षण कार्यशाळेत देण्यात आली. या कार्यशाळेत साहाय्यक मुख्य वनसंरक्षक वन्यजीव आर. एन. नळे, वाइल्ड लाइफप्रेमी निनाद शहा, भरत छेडा, संशोधक अभिजित कुलकर्णी, उप वन संरक्षक आर. एन. कुलकर्णी यांच्यासह सोलापूर, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, सांगोला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, निसर्गप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ऑगस्ट, ऑक्टोबरमध्येही गणना
माळढोकची घटती संख्या पाहता याबाबत प्रशिक्षण कार्यशाळेत माळढोक संवर्धनासाठीच्या प्रयत्नांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जुलैमध्ये पहिली गणना झाल्यानंतर याच वर्षात आणखी दोन वेळा गणना करून माळढोकची नेमकी संख्या निश्चित होणार आहे. यासाठी ऑगस्ट आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात गणना होईल. या तिन्ही वेळेस गणना झाल्यानंतर माळढोकच्या संख्येबाबतचा नक्की अंदाज येईल.
माळढोक गणनेसाठी प्रगणकांना प्रशिक्षण
माळढोक अभयारण्य नान्नज येथील विर्शामगृहात सोमवारी प्रगणकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पुणेचे सुनील लिमये, आर. एन. नळे, निनाद शहा, भरत छेडा, अभिजित कुलकर्णी, आर. एन. कुलकर्णी आदी.