आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • By Election Of Solapur Corporation On 15th December

प्रभाग 7 ची पोटनिवडणूक; 15 डिसेंबर रोजी मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अनंत जाधव यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने प्रभाग क्रमांक 7 मधील एका जागेची पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. 19 नोव्हेंबरपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होणार आहे.

गुरुवारपासून प्रभागात आचारसंहिता लागू केली जात आहे. रविवार 15 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 16 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. ही जागा राखण्यासाठी भाजपसाठी मोठे आव्हान आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव ध. मा. कानेड यांनी पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. भाजपचे नगरसेवक जाधव यांना खूनप्रकरणी जन्मठेप लागल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. त्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्याचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 7 मधील दुसर्‍या जागेवर भाजप नगरसेवक नरसूबाई गदलवालकर प्रतिनिधीत्व करीत आहेत. प्रभागातील दोन्ही जागेवर भाजप उमेदवार होते. ही जागा खुल्या प्रवर्गातील असल्याने भाजपमध्येही इच्छुकांची संख्या वाढणार आहे. उमेदवारीसाठी युवा मोर्चाचे संजय कोळी यांचे पारडे जड मानले जाते. काँग्रेसकडून मागील वेळी पराभूत झालेले गौतम कसबे हे इच्छुक आहेत. जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादीकडून लता फुटाणे तर बसपचे बबलू गायकवाड यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. शेवटी जागा जिंकण्यासाठी ऐनवेळी उमेदवारीची गणिते बदलू शकतात.

असा आहे कार्यक्रम
19 ते 25 नोव्हेंबर अर्ज उपलब्ध
19 ते 26 नोव्हेंबर अर्ज स्वीकारणे
27 नोव्हेंबर छाननी
29 नोव्हेंबर अर्ज मागे घेणे
30 नोव्हेंबर यादी प्रसिद्ध
15 डिसेंबर मतदान
16 डिसेंबर मतमोजणी
18 डिसेंबर राजपत्र जारी