आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • By Election: Two Seats With Shiv Sena BJP Alliance

पोटनिवडणूक: दोन्ही जागा युतीला, काँग्रेसला धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका पोटनिवडणुकीत दोनही जागांवर युतीचा झेंडा फडकला. प्रभाग चार "ब' मधून भारतीय जनता पक्षाच्या कांता भोसले १३०० तर प्रभाग १८ "ब' मधून शिवसेनेचे महेश कोठे हे ४८०० मताधिक्याने विजयी झाले. कोठेंच्या विरोधातील कृष्णहरी चिन्नी यांची अनामत रक्कम जप्त झाली.

या दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. महापालिका आवारात मंगळवारी मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अमिता दगडे पाटील यांनी निकाल घोषित केले. निकाल जाहीर होताच भाजप शिवसेना कार्यकर्त्यांनी मतमोजणी कार्यालय बाहेर जल्लोष केला. विजयी उमेदवांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

प्रभाग १८ चे नगरसेवक महेश कोठे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते, तर प्रभाग चार ‘ब’च्या नगरसेविका दमयंती भोसले यांच्या निधनाने जागा रिक्त झाली होती.

महापालिकेचे कर्मचारी सकाळी कामासाठी येत असताना पोलिसांकडून ठिकठिकाणी रोखले. परिणामी महापालिकेचे कामकाज दुपारी १२ पर्यंत बंद होते.

पास असून पत्रकारांना अडवले
मतमोजणीकामाकाजाचे ओळखपत्र असलेल्या पत्रकारांना मतमोजणी परिसरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले. पत्रकार कक्षात अंधार होता. इतर सोयी नव्हत्या. स्क्रीन लावले पण आवाज नव्हता. पत्रकारांना प्रवेश देण्याबाबत पोलिसांना सुचवले होते, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी अमिता दगडे पाटील यांनी दिले. पत्रकारांनी पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत मतमोजणी पास मनपा जनसंपर्क अधिका-यांकडे परत देऊन निषेध नोंदवला.

बंदोबस्ताचा झाला अतिरेक
मतमोजणीच्यानावाने पोेलिस बंदोबस्ताचा अतिरेक दिसला. सकाळी सातपासून डाॅ. आंबेडकर चौक, शुभराय आर्ट गॅलरी, डफरीन चौक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. आणि महापालिका निवडणूक कार्यालयाने मनपाचे मुख्य उत्पन्न स्रोत असलेले एलबीटी कार्यालय दोन दिवस बंद ठेवले.

दोनही जागा घरातच राहिल्या
महेशकोठे आणि कांता भोसले यांची सासू दोघे कॉंग्रेसचे नगरसेवक हाेते. ही नगरसेवक पदे कोठे आणि भोसले यांच्या घरातच राहिली.

काँग्रेसचे देवेंद्र यांच्या हाती भगवा
शिवसेनेच्यामहेश कोठे यांच्या विजयाचा आनंद काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी असा भगवा ध्वज उंच फडकवून, गळ्यात भगवे उपरणे घालून व्यक्त केला. आगामी काळातील मनपातील वा-याची दिशा यातून स्पष्ट झाली.

यातून आगामी संकेत
काँग्रेसने साडेतीन वर्षांत केेलेल्या अनगोंदी कारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा राग व्यक्त करण्याची संधी मतदारांना होती. निवडणुकीतून ती व्यक्त झाली. कांता भोसले यांना काँग्रेसकडून आॅफर असताना त्यांनी भाजपवर विश्वास दाखवला. महायुतीचे कार्यकर्ते कष्ट केल्याने हा विजय मिळाला. आगामी मनपा निवडणुकीची ही नांदी आहे. प्रा.अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजप

भविष्यात काँग्रेसच
मतदारांचाकौल आम्हाला मान्य आहे. काँग्रेसचा उमदेवार सर्वसामान्य कुटुंबातील असून विरोधी उमेदवार कोट्यधीश होता. निवडणुकीत विरोधकांनी पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. पक्षाचे दोन नगरसेवक कमी झाल्याचा कोणताही परिणाम महापालिकेतील सत्तेवर होणार नसून काँग्रेसची सत्ता राहणार आहे. भविष्यात काँग्रेस सत्ताधारी असेल. संजय हेमगड्डी, सभागृह नेता, मनपा

कारणांचा शोध घेऊ
मतदारांनीदिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडणुकीत झालेल्या चुका टाळून आम्ही दीड वर्षानंतर येणा-या महापालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरू. तेथील उमेदवार, प्रचार प्रमुख त्याभागातील पक्षाचे नगरसेवक, मान्यवर कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन पराभवाच्या कारणांचा शोध घेऊ. प्रकाशयल गुलवार, शहराध्यक्ष, काँग्रेस