आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bycotte On Examination Still Demand Not Complete ; Non Teaching Staff Warne

मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षेवर बहिष्कार ; शिक्षकेतर कर्मचा-यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेवरील बहिष्कार कायम राहील, असे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह यांनी बुधवारी जाहीर केले आहे.

पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झालेल्या महासंघाच्या कार्यकारिणी सभेत हा निर्णय घेण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्रयोगशाळा व ग्रंथालय परिचरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत देण्यात येणा-या पदोन्नती ग्रेड-पे संदर्भात राज्याचे प्रभारी उच्च शिक्षण संचालक यांनी दिनांक 2मार्च 2013 रोजी काढलेले परिपत्रक (संदर्भ पत्र क्रमांक उशिसं /2013/ ग्रेडपे मवि-1/116) चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे अनेक कर्मचा-यांचे अतोनात नुकसान होणार आहे. यात परिचरांना त्यांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे.
या परिपत्रकासही सभेत विरोध करण्यात आला. हे परिपत्रक रद्द करण्याचा ठराव महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या सभेत मंजूर करण्यात आला. तसे शासनास कळविण्यात येणार आहे.