आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबल जोडण्यांचे सर्वेक्षण करण्याचा दिला इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केबल चालकांनी जोडण्यांची संख्या वाढवून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केबल जोडण्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असा इशारा अपर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिला.

शुक्रवारी केबल ऑपरेटर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, करमणूक कर अधिकारी अर्चना शेटे, साहाय्यक अधिकारी व्ही. आर. पोद्दार उपस्थित होते.

गेल्या वर्षभरापासून केबल ऑपरेटर्सकडून केबल जोडणीची जुनीच संख्या दाखवण्यात येते. जोडण्यांची संख्या वाढवून दिली नाही तर सर्वेक्षणात आढळल्याप्रमाणे सन 2005 पासून करमणूक कर वसूल करण्यात येईल, अशी तंबी बैठकीत देण्यात आली. यामुळे केबल ऑपरेटर्समध्ये खळबळ उडाली आहे.

येत्या एप्रिल महिन्यापासून सर्वच केबल जोडण्यांसाठी सेटटॉप बॉक्स बसवणे बंधनकारक आहे. त्यामुळे केबल जोडण्यांची खरी संख्या समजणारच असल्याचे करमणूक कर अधिकार्‍यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरापासून दाखवली जात होती जुनीच संख्या
ऑपरेटर्समध्ये चलबिचल
बैठक संपल्यानंतर सभागृहाबाहेर जमलेल्या केबल ऑपरेटर्समध्ये चर्चा सुरू होती की, अचानक अशी जोडण्यांची संख्या वाढवून मागितल्यास कुठून द्यायची. प्रत्येक महिन्याला कमी जास्त जोडण्यांच्या संख्येप्रमाणे करमणूक कर भरण्यात येतो. एप्रिल महिन्यापासून सेट टॉप बॉक्स बसवल्यानंतर जोडण्यांची संख्या किती आहे ते समजेलच.

शहरी भागात प्रती केबल कनेक्शन 45 रुपये, अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात 30 तर ग्रामीण भागात 15 रुपये करमणूक कर शुल्क आकारणी होते. जिल्ह्यात नऊ नगरपालिका असून फक्त बार्शी एकच नगरपालिका अ वर्गात आहे.